Shivraj Rakshe Maharashtra Kesari : आखाड्यात कुस्ती हरली? राजकीय आखाडा कुणामुळे? Special Report
कालपासून चांदा ते बांदा एकाच गोष्टीची चर्चा आहे... ती म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीत कोण चुकलं? पैलवान शिवराज राक्षे की निर्णय देणारे पंच? आणि याच प्रश्नावरून आता नवी कुस्ती सुरू झाली आहे.. महाराष्ट्र केसरीसारखी मानाच्या स्पर्धेचा आता राजकीय आखाडा होतोय का? याच प्रश्नाचा वेध घेणारा एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट
पंचाचा निर्णय पटला नाही...
दाद मागितली, पण प्रतिसाद मिळाला नाही...
अखेर पैलवान शिवराज राक्षेनं पंचाला लाथ हाणली
पृथ्वीराज मोहोळनं महाराष्ट्र केसरीची गदा पटकवल्याची जेवढी चर्चा नाहीय, त्यापेक्षा जास्त चर्चेत आहे ती शिवराज राक्षेनं पंचाला हाणलेल्या लाथेची...
महाराष्ट्र कुस्तीगीर परीषदेला राक्षेची लाथ काही पटली नाही...
राक्षेचं तीन वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय
मात्र या निर्णयाविरोधात शिवराज राक्षे कायद्याची कुस्ती खेळण्याच्या तयारीत आहे
पृथ्वीराज मोहोळनं प्रत्यक्षात शिवराज राक्षेची पाठ टेकवली की नाही?
हा प्रश्नच वादाच्या केंद्रस्थानी आहे...
आणि या प्रश्नाचं उत्तर देताना अनेक प्रसिद्ध कुस्तीपटूंनी आणि वस्तादांनी शिवराज राक्षेच्या बाजूनं कौल दिलाय
शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड....
आपल्या दोन्ही चेल्यांचं तीन वर्षांसाठी निलंबन झाल्याने
वस्ताद काका पवारांनी तीव्र संताप व्यक्त केलाय..
चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावणार का असा प्रश्न काका पवारांनी विचारलाय..
तसंच कुस्तीचा राजकीय आखाडा कुणी केला? हा प्रश्न विचारताना त्यांनी सामन्यावेळी उपस्थित नेत्यांचा आवर्जून उल्लेख केलाय.
या सगळ्या वादावर आम्ही महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची बाजूही जाणून घेतली
तर काही वस्तादांनी पुन्हा एकदा निकाली कुस्ती भरवण्याचा सल्ला दिलाय
काही वर्षांपूर्वी कुस्तीगीर संघटनेत फूट पडली...
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि
महाराष्ट्र कुस्तीगीर संघ असे दोन वेगवेगळे गट निर्माण झाले..
एकेकाळी कुस्तीच्या आखाड्यावर शरद पवारांचं वर्चस्व होतं..
सध्या रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली कुस्तीगीर परिषदेचं कामकाज चालतं...
राजकीय नेत्यांनी कोणत्या संघटनेचं नेतृत्व करण्यात वावगं काहीच नाही...
मात्र त्या संघटनांचा वापर राजकीय आखाड्यासाठी होत असेल तर नक्कीच आक्षेपार्ह आहे..
महाराष्ट्र कुस्तीचा राजकीय आखाडा होतोय का?
आणि या आखाड्यात कुस्तीचाच पराभव तर होत नाहीय ना?
याचा सर्वांनीच गांभीर्यानं विचार करायला हवा..
All Shows

































