Horoscope Today 26 February 2025: आज महाशिवरात्रीता दिवस खास! 'या' 5 राशींचं नशीब चमकणार; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 26 February 2025: 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 25 February 2025: पंचांगानुसार, आज 26 फेब्रुवारी 2025, आज बुधवारचा दिवस आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज भाग्याची साथ मिळेल, तुमच्या मनातील गोष्टी पूर्ण होण्याच्या मार्गावर राहतील.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
थोडक्यात ज्ञानावर कोणत्याही कामाची जबाबदारी घेऊ नका गोष्टी अंगलट येतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मुलांच्या अवास्तव मागण्यांमुळे घरात थोड्या कटकटी होतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज तुमची मते स्पष्टपणे मांडायला घाबरू नका, महिलांनी घरातील वातावरणही आनंदी ठेवावे
सिंह रास (Leo Horoscope Today)
आज हट्टीपणा वाढेल पण दुसऱ्यांनी मात्र समजून घ्यावे असा मानस राहील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आज स्वभावाला थोडी मुरड घालावी लागेल, तुम्हाला लांबच्या प्रवासाचे योग येतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
प्रवासामध्ये प्रकृतीची आणि वस्तूंची काळजी घ्यावी
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
महत्त्वाची गुंतवणूक न केलेली बरी, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
नोकरीमध्ये तुमच्या कामाचा फायदा लगेच मिळेल, अशी अपेक्षा ठेवू नका
मकर रास (Capricorn Horoscope Today)
तुमच्या आमच्या धडाडीचा फायदा होईल, तुम्हाला उत्साही बनवणारे लोक आजूबाजूला भेटतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
महिला क्रियाशील राहतील, कलेच्या क्षेत्रात काम कराल
मीन रास (Pisces Horoscope Today)
किरकोळ मुद्द्यांवर तात्विक वाद उकरून काढाल, इतरांना होणाऱ्या त्रासाची आज परवा करणार नाही.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा>>>
Maha Shivratri Wishes 2025 In Marathi: शिव सत्य आहे.. शिव अनंत आहे..! महाशिवरात्रीनिमित्त प्रियजनांना पाठवा सर्वोत्तम भक्तिमय शुभेच्छा संदेश!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )




















