एक्स्प्लोर

पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करणारं 'हे' गाव ठरलं राज्यात पहिलं; गावकऱ्यांना झाला असा फायदा

Chhatrapati Sambhajinagar : या गावातील नागरिकांना 70 रुपये किलोने सिलेंडरद्वारे मिळणारा गॅस फक्त 35 ते 40 रुपये किलोने मिळते.

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मुंबई, ठाणे, पुणे वगळता कुठल्याही शहरांमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा (Gas Supply) होत नाही. असे असतांना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील लाडगावने एक नवा आदर्श घालून दिला आहे. दोन हजार लोकवस्ती असलेल्या या गावात संपूर्ण घरांना गॅस पाईपलाईनद्वारे पुरवठा करण्यात येतो. छत्रपती संभाजीनगरच्या लाडगावने या शहरांना मागे टाकत संपूर्ण गावात पाईपने गॅस पुरवठा करण्याचा प्रकल्प यशस्वी करून दाखवला आहे. विशेष म्हणजे पाईपने गॅस पुरवठा करणारा हा गाव महाराष्ट्रातील पहिलचं गाव ठरला आहे.

छत्रपती संभाजीनगरपासून 22 किलोमीटर असलेलं लाडगाव जवळपास 2 हजार लोकवस्तीचं गाव आहे.  या गावातील प्रत्येक घरात गॅस कनेक्शन आहे. कधीकाळी चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या गावातील महिला आता गॅसवर स्वयंपाक करत आहे. गावातील स्लॅबच घर असो की, मातीचं प्रत्येक घरात तुम्हाला गॅस कनेक्शन पाहायला मिळणार. विशेष म्हणजे या गावातील नागरिकांना 70 रुपये किलोने सिलेंडरद्वारे मिळणारा गॅस फक्त 35 ते 40 रुपये किलोने मिळते. एकीकडे गॅसचे दर गगनाला भिडले असतांना या गावाला एवढ्या स्वस्तात गॅस कसा मिळतो असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण याचं कारण ठरलं आहे ते गॅसची पाईपलाईन. आतापर्यंत मोठ मोठया शहरात जी गॅसची पाईपलाईन पोहचू शकली नाही, ती गॅसची लाईन लाडगावात पोहचली आहे. या गावातील आतापर्यंत 380 घरात गॅस पाईपलाईनेच पुरवठा केला जातो.

एका छोट्याशा खेड्या गावात हे सर्व शक्य कसं झालं, असाही प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. तर त्याच झालं असं की, गावापासून अर्धा किलोमीटर दूरवर एलएनजी म्हणजे लिक्विफाइड नॅचरल गॅसचा प्लांट आहे. या प्लांटवर गुजरातहुन एलएनजी गॅस आणला जाते आणि त्याच्या माध्यमातून सीएनजी आणि पीएनजी गॅस तयार होतो. दरम्यान, कंपनीने गावाकडे पाईपलाईनद्वारे गॅस वितरित करण्याची तयारी दर्शवली. गावकऱ्यांनी लगेच होकार देत एनओसी दिली आणि अवघ्या काही दिवसांत गावात पाईपलाईनद्वारे गॅस पोहचले. विशेष म्हणजे या गावाच्या सरपंच महिला असल्याने त्यांना गॅसची किंमत आणि महत्व माहीत होते. त्यामुळे त्यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आणि गावतील प्रत्येक घरात पाईपलाईनद्वारे गॅस नेऊन पोहचवला. 

'हर घर गॅस का नल'

घरगुती गॅस सिलेंडरचा दर सध्या हजाराच्या घरात जाऊन पोहचले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना गॅस वापरणं शक्य होत नाहीये. यावर पर्याय म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवण्याची योजना आखली जात आहे. पण सरकारी काम आणि सहा महिने थांब अशा परिस्थितीत ही योजना कधी मार्गी लागेल याबाबत सांगणं कठीण आहे. पण, त्याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावाने 'हर घर गॅस का नल' योजना पूर्ण करून दाखवली आहे.  त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून योजना पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराने आणि प्रशासनाने या गावाकडून काहीतरी शिकले पाहिजे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

LPG Prices: 9 वर्षात एलपीजीचे दर 185 टक्क्यांनी वाढवले अन् 17.5 टक्क्यांनी घटवले; काँग्रेसचा आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget