एक्स्प्लोर

खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  

खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असल्याचं भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी सांगितलं आहे. त्यामुळं आता महायुतीच्या स्थानिक नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

पुणे : पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या 5 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेश झाल्यानंतर पाचही नगरसेवकांनी पुण्यातील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पहिल्याच पत्रकार परिषदेत खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असल्याचं भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी ठासून सांगितलं आहे. त्यामुळं आता महायुतीच्या स्थानिक नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

पुण्यातील पाच माजी नगरसेवकांनी ठाकरेंना केला अखेरचा जय महाराष्ट्र

पुण्यातील पाच माजी नगरसेवकांनी ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. विशाल धनवडे, प्राची आल्हाट, बाळा ओसवाल, संगीता ठोसर आणि पल्लवी जावळे या पाचही माजी नगरसेवकांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पुण्यात  आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी खरी शिवसेना ही ठाकरेंचीच असल्याचं सांगितलं.  आता नव्याने भाजपात दाखल झालेल्या या नेत्यांच्या वक्तव्यामुळे पुण्यातील महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. 

खरी शिवसेना ही ठाकरेंचीच 

खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे. पण जे काही राजकारण सुरु आहे ते चालूच राहील असं वक्तव्य विशाल धनवडे यांनी केलं.  आमच्या पक्षप्रवेशाच्या पहिल्याच दिवशी आम्ही सांगितलेल आहे. ज्या पक्षामध्ये आम्ही 25 वर्ष होतो तो पक्ष वाढवण्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले ते अतिशय प्रामाणिक होते. त्यामुळं त्या पक्षाविषयी आमच्याकडून कोणताही चुकीचा शब्द जाणार नाही असे धनवडे म्हणाले. शिंदे यांनी शिवसेना चोरली हे आत्तापर्यंत तुम्ही बोलत होतात त्यावर तुम्ही ठाम आहात का? असा प्रश्न विशाल धनवडे यांना विचारण्यात आला. यावेळी धनवडे म्हणाले की, 100 टक्के आम्ही आजही त्यावरच ठाम आहोत. मात्र, न्यायालयात जो काही निकाल लागेल त्याला आम्ही सामोरे जाऊ असेही धनवडे म्हणाले. 

 शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल आणि पल्लवी जावळे यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर धनवडे आणि ओसवाल यांनी समाज माध्यमांतून आपली भूमिका स्पष्ट करताना पक्षांतर करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मुंबईच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज त्यांनी पुण्यात भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी खरी शिवसेना ही ठाकरेंचीच असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं पुण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे. भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे कार्यकर्ते काय बोलणार याकडं आता सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ

व्हिडीओ

Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report
Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report
Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report
Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
Embed widget