एक्स्प्लोर

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात? याबाबतची तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. 

L&T चे चेअरमन एसएन सुब्रमण्यन यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातूनhttps://marathi.abplive.com/business/sn-subrahmanyan-advocating-90-hour-work-per-week-and-facing-criticism-then-l-and-t-gives-clarification-on-issue-1337809 दिलाय. याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. त्याच्या या वक्तव्यावर देखील जोरदार टीका केली जातेय. दरम्यान, जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात? याबाबतची तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. 

सध्या देशभरात एका आठवड्यात 90 तास काम करण्याच्या विषयाची चर्चा आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील दिग्गज लार्सन अँड टुब्रो (L&T) चे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना 'आठवड्यातून 90 तास काम' करण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसऱ्या बाजुला इन्फोसिसचे सह-संस्थापक NR नारायण मूर्ती यांनी 70 तास काम करण्याचाही काही दिवसापूर्वी सला दिला होता.

भारतीय कर्मचारी दर आठवड्याला 46.7 तास काम 

70 ते 90 तासांच्या कामाचा आठवडा हा मुद्दा भारतात चर्चेचा विषय असला तरी, जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, भारत आधीच जगातील सर्वाधिक काम करणाऱ्या देशांमध्ये आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार एका अहवालात असे म्हटले आहे की सरासरी भारतीय कर्मचारी दर आठवड्याला 46.7 तास काम करतात. 

कोणत्या देशात सर्वाधिक लोक काम करतात?

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मते, आठवड्यात सर्वाधिक तास काम करणाऱ्या देशांमध्ये भूतान अव्वल स्थानावर आहे, या ठिकाणी कर्मचारी आठवड्यात 54.4 तास काम करतात. याशिवाय UAE मध्ये 50.9 तास, काओंगो मध्ये 48.6 तास, कतारमध्ये 48 तास काम करतात. तसेच पहिल्या 10 देशांच्या यादीत भारताशिवाय बांगलादेश, पाकिस्तान आणि चीनताही समावेश आहे. 

जगात कामाचे सरासरी 40 ते 50 तास 

जगभरातील सरासरी साप्ताहिक कामाचे तास 40-50 तासांच्या दरम्यान आहेत. असे अनेक देश आहेत जेथे या निश्चित मर्यादेपेक्षा किंचित जास्त तास काम केले जाते, परंतु विशेषतः उच्च उत्पन्न किंवा विकसित देशांमध्ये साप्ताहिक कामाचे तास कमी ठेवले जातात. अनेक देशांमध्ये आठवड्यातून चार दिवस काम केले जाते. एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांना जास्त तास काम करायला लावल्यास त्यांना ओव्हरटाइम बक्षीस देण्याचीही तरतूद आहे.

नेमकं काय म्हणाले होते एस.एन. सुब्रह्मण्यन ?

एस.एन. सुब्रह्मण्यन हे त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे  चर्चा करत होते. यावेळी त्यांनी एका आठवड्यात 90 तास काम करण्याचं समर्थन केलं. ते म्हणाले की मला खेद वाटतो की मी तुमच्याकडून रविवारी काम करुन घेऊ शकत नाहीत. जर मी तसं करु शकलो तर मला जास्त आनंद होईल, कारण मी स्वत: रविवारी काम करतो. Reddit वर प्रसारित झालेल्या एका व्हायरल व्हिडिओत असं पाहायला मिळतं की एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी आठवड्यात केवळ 90 तास करम्याचा सल्ला दिलेला नाही तर कर्मचाऱ्यांना म्हटलं की 'तुम्ही घरी थांबून पत्नीला किती वेळ पाहणार, घरी कमी कार्यालयात अधिक वेळ घालवा', यानंतर सोशल मीडियावरुन एस.एन. सुब्रह्मण्यन यांच्यावर टीका सुरु झाली. 

महत्वाच्या बातम्या:

SN Subrahmanyan: पत्नीकडे किती वेळ पाहणार? 90 तास काम करा,एल अँड टीचे चेअरमन सल्ला देऊन फसले, ट्रोल होताच कंपनीचं स्पष्टीकरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीकाMaharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray : बाळासाहेब होते तेव्हा इंडिया आघाडी नव्हती,त्यांच्या स्मारकाबाबत इंडिया आघाडीचं...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Yuzvendra Chahal : लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
Embed widget