Bajrang Sonwane On Pankaja Munde : यांना सर्व काही आयतं आणि फुकट मिळालं, त्यामुळे किंमत कळणार नाही; बजरंग सोनवणेंचा मुंडे बहीण-भावावर पहिला हल्ला
Bajrang Sonwane On Pankaja Munde : महाविकास आघाडीकडून बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात पहिली बैठक घेतली आहे.
Bajrang Sonwane On Pankaja Munde : बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान उमेदवारी जाहीर होताच पंकजा यांच्यानंतर आता बजरंग सोनवणे यांनी देखील प्रचार सुरु केला असून, त्यांच्या प्रचाराची पहिली बैठक परळी विधानसभा मतदारसंघात (Parli Assembly Constituency) झाली. आपल्या पहिल्याच्या बैठकीत त्यांनी थेट धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे (Pritam Munde) या मुंडे बहीण भावावर हल्लाबोल करत टीका केली आहे. यांना सर्व काही आयतं आणि फुकट मिळालं, त्यामुळे किंमत कळणार नाही, पण मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याचे सोनवणे म्हणाले.
महाविकास आघाडीकडून बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात पहिली बैठक घेतली आहे. या बैठकीतून सोनवणे यांनी मुंडे बहीण-भावावर कडाडून टीका केलीय. परळीतील वैधनाथ सहकारी साखर कारखाना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी उभा केला, परंतु त्यांच्यानंतर यांना आयतं मिळालं. त्यामुळे यांना कारखान्याची किंमत काय कळणार. यांना सर्व फुकट आणि आयतं मिळाले आहे. पंकज मुंडे यांनी 2009 मध्ये जेव्हा विधानसभा निवडणूक लढवली होती, त्यावेळी त्यांची राजकीय कारकीर्द काय होती? असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला. माझी उंची आणि लायकी काढली जाते, पण मी 1992 ला निवडणूक लढवली आहे. राजकीय अनुभव मलाच जास्त असल्याचा दावा सोनवणे यांनी यावेळी केला आहे.
मी सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेलो नाही....
आम्ही रोजगार हमीचे कार्यकर्ते आहोत. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेलो नाही. यात आमची चूक नाही. माझे वडील शेतकरी आहेत, त्याचा मला रास्त अभिमान आहे. मला राजकीय जन्म देणारे ही मायबाप जनता आहे, असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर परळीतून टीकास्त्र सोडले आहे.
पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांसोबत पाडवा साजरा केला...
बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त बीड जिल्ह्यातील धनगरवाडी गावात गुढी उभारून ऊसतोड कामगारांसोबत पाडवा साजरा केला आहे. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात पंकजा मुंडे यांचे स्वागत केले. महिलांनी पंकजा मुंडे यांचे औक्षण करत फुलांची उधळण केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी गावातील ऊसतोड कामगाराच्या घरावर गुढी उभारली. यावेळी ग्रामस्थांचा मोठा उत्साह दिसून आला.
इतर महत्वाच्या बातम्या :