एक्स्प्लोर
खोक्याचं साम्राज्य उध्वस्त! वनविभागाच्या कारवाईनंतर अज्ञातांनी जनावरांचा चारा पेटवून दिला, सतिश भोसलेच्या घरातील महिलेला मारहाणीचा प्रयत्न
खोक्याचे अनेक गुन्हेगारी व्हिडिओ समोर आल्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्याला प्रयागराज येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला

Khokya
1/9

खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर वनविभागाने कारवाई केल्यानंतर अज्ञातांनी त्याच्या घराबाहेर पडलेल्या जनावरांच्या चाऱ्यालाही पेटवून देण्याचा प्रयत्न केला .
2/9

केवळ चारा किंवा सामान पेटवून दिले असे नाही तर अज्ञातांनी खोक्याच्या घरातील महिलेलाही मारहाण केल्याचा प्रकार समोर आला .
3/9

गेल्या काही दिवसांपूर्वी खोक्याचे दहशत पसरवतानाचे व्हिडिओज समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती .
4/9

भाजपचा पदाधिकारी आणि भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या 'खोक्या भाई 'चे नवनवे कारनामे समोर येऊ लागल्यानंतर वनविभागाने खोक्यावर कारवाई केली .
5/9

वनविभागाच्या जागेवर असलेली टोलेजंग इमारत, त्याच्या बाजूला असलेले त्याचे ऑफिस वनविभागाने पडल्यानंतर खोक्याचा संसार अस्ताव्यस्त पडलाय .
6/9

ज्या जागेत खोक्याचे घर आणि ऑफिस होते तिथे झालेल्या कारवाईनंतर काही अज्ञातांनी खोक्याच्या घराशेजारी असलेल्या जनावराचा चारा जाळत महिलेला मारहाण प्रयत्न केला .
7/9

महिलेला मारहाण करणारे लोक कोण होते हे अद्याप समजू शकले नाही .
8/9

दरम्यान, या कारवाईनंतर कोणाचे घर पाडणे ही चांगली गोष्ट नाही. ती ॲक्शन का घेण्यात आली? हे सुद्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मी बोलणार असल्याचे सुरेश धस यांनी म्हटल्याने मोठी चर्चा होती..
9/9

दहशतीमुळे खोक्याबद्दल समाजात असलेला रोष किती वाईट होती हे पुन्हा एकदा समोर आलंय.
Published at : 17 Mar 2025 03:11 PM (IST)
Tags :
Beedअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion