Ankita Lokhande : 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे होणार आई? बेबी बंप लपवतानाचे फोटो व्हायरल
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती बेबी बंप लपवताना दिसत आहेत.

Ankita Lokhande Pregnant : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर ती वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिचा मोठा चाहतावर्गही आहे. दरम्यान अंकिताने सोशल मीडियावर (Social Media) तिचे साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवरुन आता अंकिता प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
बेबी बंप लपवताना दिसली अंकिता लोखंडे (Ankita Lokhande Hiding Baby Bump)
अंकिता लोखंडेने हिरव्या रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच या साडीवर तिने आकर्षक कानातले घातले आहेत. या फोटोंमध्ये ती हात आणि पर्सने बेबी बंप लपवताना दिसत आहे. अंकिताच्या या फोटोंमुळे ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. पण अभिनेत्रीने आणि विकी जैनने यासंदर्भात मौन कायम राखलं आहे.
अंकिताच्या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव
अंकिता लोखंडेच्या (Ankita Lokhande) फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अंकिता तू खरचं प्रेग्नेंट आहेस का? गुड न्यूज कधी देणार आहेस? अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. दर दुसरीकडे अंकिताचे साडीतील फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
अंकिता लोखंडे 2021 साली विकी जैनसोबत (Vicky Jain) लग्नबंधनात अडकली. थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतरचा प्रत्येक सण साजरा करताना अंकिता दिसून आली. विकी जैनआधी अंकिता सुशांत सिंह राजपूतसोतबत (Sushant Singh Rajput) रिलेशनमध्ये होती. जवळपास सहा वर्षे अंकिता आणि सुशांत रिलेशनमध्ये होते. सुशांतच्या निधनानंतर दिड वर्षांनी अंकिताने विकीसोबत लग्न केलं.
View this post on Instagram
अंकिता लोखंडेबद्दल जाणून घ्या... (Ankita Lokhande)
अंकिता सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या मालिकेच्या माध्यमातून अंकिता घराघरात पोहोचली. 'पवित्र रिश्ता'सह 'झलक दिखला जा 4','कॉमेडी सर्कस' आणि 'एक थी नायिका' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांतदेखील अंकिताने काम केलं आहे. आता अंकिताच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संंबंधित बातम्या
Ankita Lokhande, Vicky Jain : अंकिता लोखंडे-विकी जैनने जिंकला ‘स्मार्ट जोडी’ शो, पतीचं कौतुक करत अभिनेत्री म्हणते...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
