Nashik News : सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
Nashik News : नाशिकच्या बागलाण तालुक्यातील दहाणे गावातील सलून व्यावसायिकाने टोकाचे पाऊल उचलले आहे.

Nashik News : उसनवारी व व्याजाने घेतलेल्या पैशांची वेळेवर परतफेड न करू शकल्यामुळे नाशिकच्या बागलाण तालुक्यातील दहाणे गावातील सलून व्यावसायिकाने सटाणा शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या आविष्कार लॉजमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दन्हाणे गावातील 25 वर्षीय तरुण जनार्दन विजय महाले याने साधारण सहा महिन्यांपूर्वी आर्थिक उलाढाल करताना हातउसनवार व व्याजाने पैसे घेतले होते. वेळेवर पैसे परत न करता आल्याने तो गाव सोडून इतरत्र राहायला निघून गेला होता. पैसे मागणाऱ्यांचा तगादा सतत सुरू होता.
पंख्याला गळफास घेत आत्महत्या
रक्कम वेळेवर दिली जाणार नसल्याचा अंदाज आल्याने वैफल्यग्रस्तातून सटाणा शहरातील आविष्कार लॉजवर खोली घेऊन मुक्कामी राहण्याचे कारण देत जनार्दन याने पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. लॉजवरील कर्मचाऱ्यांच्या सदरची बाब लक्षात येताच त्यांनी सटाणा पोलिसांना कळविले. जनार्दन यांच्या भावाने पोलिसांत दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस टिळेकर व उमेश भदाणे करीत आहेत.
चुंचाळे शिवारातही युवकाची आत्महत्या
चुंचाळे शिवारात युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुमीत वसंत पाईकराव (20, रा. घरकुल, चुंचाळे शिवार) असे मृताचे नाव आहे. सुमित याने रविवारी (दि. 16) दुपारी अडीचच्या सुमारास घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नाशिक-पुणे महामार्गावरील पंपावर दरोडा
दरम्यान, नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटाच्या जवळ असलेल्या वाघ मोटर्स या टाटाच्या डीईएफ पंपावर चौघांनी तलवार, कोयता, दांडे घेऊन दरोडा टाकत 40 हजारांची रोकड लुटल्याची घटना रविवारी (दि.16) रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. मोहदरी घाटाच्या पहिल्या वळणावर असलेल्या वन विभागाच्या वनोद्यानाच्या समोरील बाजूस रस्त्याच्या कडेला प्रशांत वाघ यांचा टाटा मोटर्सचा डीईएफचा पंप एक वर्षांपासून सुरु आहे. पंपाच्या पाठीमागील बाजूस राणेखानचे जंगल असून त्याच भागातून अंधाराचा फायदा घेत चौघा दरोडेखोरांनी पंपाच्या कार्यालयात प्रवेश केला. यानंतर तलवार, कोयत्याचा धाक दाखवत जवळपास 40 हजारांची रोकड लुटली व तेथून पलायन केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nashik News : नाशिकच्या महिलेने भोंदूबाबाला इंगा दाखवला, कन्झ्युमर कोर्टात खेचून नुकसान भरपाई मिळवली























