एक्स्प्लोर
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
tanaji Sawant: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच माजी मंत्र्यांची पोलीस सुरक्षा हटवण्याचे आदेश काढले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची झेड प्लस सुरक्षा कायम.
Devendra Fadnavis & Tanaji Sawant
1/11

शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group) नेत्यांच्या सुरक्षेत (Security) कपात करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा (Y-grade security) होती. ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. यामध्ये माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचाही समावेश आहे.
2/11

तानाजी सावंत यांनी आधीच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असताना त्यांनी हट्टाने त्यांच्या सुरक्षेसाठी 48 पोलीस कर्मचारी नियुक्त करुन घेतले होते. मात्र, ते आता मंत्री नसल्यानं त्यांची सुरक्षाव्यवस्था काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता केवळ एक पोलीस सुरक्षारक्षक उरला आहे.
Published at : 18 Feb 2025 02:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























