Jitendra Awhad : संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
Jitendra Awhad : सनातनी मनुवाद्यांनी कायम कांडरचले आणि संभाजी महाराज संगमेश्वरला हाथी सापडले. आणि त्यांचा पुढे अंत झाला. अशी बोचरी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Jitendra Awhad : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांना संपवण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले होते. त्यात औरंगजेबाचा मुलगा अकबर हा संभाजी महाराजांकडे गेला होता आणि तो औरंगजेबाला संपवतो असे म्हणाला होता. याच लोकांनी अकबर याला आपल्या सोबत घेऊन संभाजी महाराज यांना संपवण्याचा डाव रचला आणि त्यांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली देऊन मारून टाकले. संभाजी महाराज यांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केले आहे. सर्वात शूर राजा, सर्वात चाणाक्ष राजा, अनेक भाषांवर प्रभुत्व असणारा राजा, पुस्तके लिहिणारा राजा, त्याला औरंगजेब कधीही हरवू शकला नसता. या सनातनी मनुवाद्यांनी कायम कांडरचले आणि संभाजी महाराज संगमेश्वरला हाथी सापडले. आणि त्यांचा पुढे अंत झाला. अशी बोचरी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांविषयी विकिपीडियावर (Wikipedia) केलेल्या आक्षेपार्ह लिखाणासंदर्भात ते बोलत होते.
बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे का की मोर्चे काढून न्याय मागा?
एक मागासवर्गीय माणूस मारून टाकला जातो आणि सुरेश धस मला म्हणतायेत की मोर्चे काढा म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे का की मोर्चे काढून न्याय मागा म्हणून. या माऊलीने जर व्हिडिओ काढला नसता तर महादेव मुंडेंची केस पुढे गेली नसती. मी आधीपासून महादेव मुंडेच्या केसमध्ये आहे. या माऊलीने हिम्मत करून व्हिडिओ काढला आणि हा महाराष्ट्रभर मर्डर गेलाय. तरी देखील पोलिसांना शोध लागत नाही. आरोपी कोण आहेत हे परळीतले एकही घर नाही की त्यांना माहिती नाही. मुंडेंच्या राजीनामा बाबत अजित पवारांनी स्वतःच्या अंगावरचे काढून टाकलं, असं करायला नाही जमत जबाबदारी घ्यावी लागते. जवाबदारी सोडून जमत नसल्याचे ही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का देण्यात आल्याचे बोलले जात आहे. आव्हाड यांचे अत्यंत निकटवर्तीय अभिजीत पवार, हेमंत वाणी आणि सीमा वाणी यांनी आव्हाडांची साथ सोडली असल्याची माहिती पुढे आली आहे. या तीन नेत्यांची थोड्याच वेळात मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश होणार असल्याचे ही सांगितले जात आहे. या प्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कदाचित राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचे एकेकाळचे खंदे कार्यकर्ते आनंद परांजपे यांच्यानंतर आता अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी देखील आव्हाडांची साथ सोडली असल्याचे पुढे आले आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
