दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
10 फेब्रुवारी रोजी रात्री 12.30 वाजता एक डेडबॉडी सापडल्यासंदर्भात माहिती मिळाली होती. एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीती ही घटना घडली होती.

पुणे : मित्रा-मित्रांमधील भांडणं ही काही नवीन नाहीत, पण अनेकदा दोस्तीत कुस्ती होऊन हत्येचा प्रयत्न किंवा हत्या करण्यापर्यंतच्या दुर्दैवी घटना घडता. त्यामुळे, दोन्ही कुटुंबीयांना मोठा त्रास सहन करावा लागतो, अनेकदा या गंभीर गुन्ह्याचं कारण देखील किरकोळच असतं. आता, पुण्यात (Pune) घडलेली अशीच एक घटना समोर आली असून दोन मित्र दारु प्यायला बसले असता त्यांच्यात वाद झाला. त्यातूनच एका मित्राने (Friends) दुसऱ्या मित्राचा पहार घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलिसांना रक्ताने माखलेला मोबाईल अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. याबाबत पुण्याच्या पोलीस (Police) उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. या घटनेतील मृत व्यक्ती हा बिहारचा होता, तर ज्याने खून केला तो पश्चिम बंगालचा आहे.
10 फेब्रुवारी रोजी रात्री 12.30 वाजता एक डेडबॉडी सापडल्यासंदर्भात माहिती मिळाली होती. एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीती ही घटना घडली होती. बिरन सुबल आणि नयन प्रसाद दोघे मित्र त्यातील एक बिहारचा आणि दुसरा पश्चिम बंगालचा. हे दोघेही कामानिमित्त पुण्यात आले होते, कात्रज परिसरात राहू लागले. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी दोघे दारु प्यायला एकत्र बसले होते. मात्र, किरकोळ वादातून त्यांची जोराची भांडणं झाली आणि हे प्रकरण हत्येपर्यंत गेलं. 8 फेब्रुवारीच्या रात्री दोघेही आंबेगाव पठार परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत मद्यपान करत बसले होते. मद्यप्राशन केल्यानंतर बिरन सुबल याला घटस्फोटीत पत्नीची आठवण झाल्याने त्याने तिला फोन केला. मात्र, त्याचा फोन उचलला गेला नाही. हे पाहून नयन प्रसाद याने खालच्या भाषेत कमेंट करत बिरनची चेष्टामस्करी केली. दोघांमधील हाच चेष्टामस्करीचा वाद टोकाला पोहोचला, हाच राग अनावर झाल्याने बिरनने शेजारीच पडलेली लोखंडी पहार घेऊन नवीन प्रसाद याच्यावर जोरदार वार केले. या घटनेत नवीन प्रसादचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी बिरन पुण्यातून पळून गेला. त्यानंतर, तो मूळ राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये गेला होता.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला, इकडे दोन दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला. मृतदेह सडू लागल्याने मयताची ओळखही पटत नव्हती. खून झालेला व्यक्ती आणि आरोपी कोण याचा मागमूसही लागत नव्हता. मात्र, त्याठिकाणी रक्ताने माखलेला एक मोबाईल पोलिसांना सापडला. रक्ताने माखलेला हा मोबाईलच शेवटी बोलला, या मोबाईलच्या आधारे तांत्रिक विश्लेषण आणि तपास करत पोलिसांनी आरोपी बिरन सुबल कर्माकर याला पश्चिम बंगालमधील हावडा याठिकाणी जाऊन बेड्या ठोकल्या. अखेर एका मोबाईलमुळे या खुनाच्या गुन्ह्याचा तपास उलगडला.
हेही वाचा
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
























