Rashid Khan in IPL : नादखुळा! आयपीएलमध्ये राशिद खानचा धमाका, शेवटच्या 10 चेंडूत 4 विकेट
PBKS vs GT, IPL 2023 : राशिद खानचा (Rashid Khan) आयपीएलमधील धमाका कायम आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात त्याने आयपीएलमध्ये शेवटच्या 10 चेंडूत चार विकेट घेतल्या.
Rashid Khan in IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पंजाब किंग्सवर (Punjab Kings) दणदणीत विजय मिळवला. यंदाच्या मोसमातील 18 वा (IPL 2023 Match 18, Gt vs PBKS) सामना मोहालीमध्ये (Mohali) 13 एप्रिल रोजी पार पडला. कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात पुन्हा एकदा गुजरात (GT) संघाने पंजाबचा (PBKS) पराभव केला. याआधीच्या सामन्याला पांड्या मुकला होता. गुजरात संघाचा गोलंदाज राशिद खाने सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. राशिद खानचा आयपीएलमधील धमाका कायम आहे. गेल्या सामन्यात हॅटट्रिक घेणाऱ्या राशिद खानने या सामन्यातही आपली अप्रतिम कामगिरी कायम ठेवली आहे.
पंजाबविरुद्धच्या पहिल्याच षटकात राशिदने विकेट घेतली. मोहालीमधील पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या 10 चेंडूत चार विकेट घेतल्या. आयपीएलच्या 18 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा स्टार लेगस्पिनर राशिद खानने अप्रतिम गुगली टाकली. या चेंडूने त्याने पंजाब किंग्जकडून शानदार फलंदाजी करणाऱ्या मॅथ्यू शॉर्टला क्लीन बोल्ड केलं. चेंडू कधी स्टंपवर येऊन आदळला हे लक्षात न आल्यानं फलंदाज चक्रावून गेला होता.
Rashid Khan has taken 4 wickets in the last 10 balls in IPL.
— Johns. (@CricCrazyJohns) April 13, 2023
What a cricketer in T20.
राशिदने पहिल्याच षटकात घेतली विकेट
गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मॅथ्यू शॉर्टला रोखण्यात कमी पडत होते. यावेळी कर्णधार हार्दिक पांड्याने राशिद खानकडे चेंडू सोपवला. राशिद खानने मॅथ्यू शॉर्टला पहिल्याच षटकात क्लीन बोल्ड केलं. मॅथ्यू शॉर्ट 24 चेंडूत 36 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार लगावला. मॅथ्यू शॉर्ट बाद झाल्याने पंजाब किंग्सचा वेग मंदावल्याचं दिसून आलं. पंजाब विरुद्धच्या सामन्यात राशिदने चार षटकांत 26 धावा देत एक गडी बाद केला.
शेवटच्या 10 चेंडूत चार विकेट
फिरकीपटू राशिद खानने केकेआरविरुद्ध आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि शार्दुल ठाकूर यांच्या विकेट घेतल्या. आयपीएल 2023 मध्ये राशिद खानला पहिली हॅटट्रिक मिळवली. त्यानंतर पंजाब विरुद्धच्या सामन्यात पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शॉर्टची विकेट काढली. यावेळी राशिद खानने आयपीएलमध्ये दोन सामन्यांदरम्यान म्हणजेच शेवटच्या 10 चेंडूत 4 विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली. राशिद खानकडून गुजरातसाठी अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. राशिद खान टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा हॅटट्रिक घेण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :