Rabada IPL Record : आयपीएलमध्ये रबाडाची 'शंभर नंबरी' कामगिरी! सर्वात जलद 100 विकेट घेणारा खेळाडू, मलिंगाला टाकलं मागे
Kagiso Rabada : आयपीएलमध्ये (IPL) सर्वात कमी डावात 100 बळी घेण्याचा विक्रम कगिसो रबाडाच्या नावावर झाला आहे. त्याने मलिंगाला मागे टाकत अवघ्या 64 डावात ही कामगिरी केली आहे.
Kagiso Rabada fastest To Take 100 Wickets In IPL : आयपीएल 2023 (IPL 2023) मधील 18 व्या सामन्यात, पंजाब किंग्स (PBKS) संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या (GT) सामन्यात रिद्धिमान साहाची विकेट घेत एक नवीन विक्रम नावावर केला. आता आयपीएलमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेण्याच्या यादीत रबाडा पहिल्या स्थानावर आहे. रबाडाने आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात 100 विकेट्स घेण्याचा विक्रम रचला आहे. यापूर्वी हा विक्रम माजी अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावावर होता.
Rabada IPL Record : आयपीएलमध्ये रबाडाची शंभर नंबरी कामगिरी
आयपीएलच्या 16 व्या मोसमात गुजरात विरुद्धचा सामना रबाडाचा यंदाच्या मोसमातील पहिला सामना होता. कगिसो रबाडाचा आयपीएल टी-20 लीगमध्ये हा 64 वा सामना होता. या सामन्यात रबाडाने आपल्या 100 विकेट्स पूर्ण केल्या. तो सर्वात जलद 100 विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये 70 डावात विकेट पूर्ण केल्या होत्या. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 81 डावात 100 विकेट पूर्ण घेतल्या आहेत.
𝐴𝑎𝑡𝑒 ℎ𝑖 𝑑𝑖𝑙 𝑘ℎ𝑢𝑠ℎ 𝑘𝑎𝑟 𝑑𝑖𝑡𝑡𝑎, Rabada veere! 🙌
— JioCinema (@JioCinema) April 13, 2023
Kagiso Rabada is 🔙 with pace 🔥 as he brings up a 💯 wickets in #TATAIPL✨#PBKSvGT #IPLonJioCinema #IPL2023 | @KagisoRabada25 @PunjabKingsIPL pic.twitter.com/vnXHyt3quI
Rabada IPL Record : सर्वात कमी चेंडूं टाकत घेतल्या 100 विकेट्स
आयपीएलमध्ये 100 विकेट्स घेण्याच्या कगिसो रबाडाने सर्वात कमी डावात ही कामगिरी केली आहे. त्याचबरोबर त्याने उर्वरित गोलंदाजांच्या तुलनेत कमीत कमी चेंडू टाकले आहेत. रबाडाने आयपीएलमध्ये 100 विकेट पूर्ण करण्यासाठी एकूण 1438 चेंडू टाकले आहेत. यामध्ये, लसिथ मलिंगाचे नाव दुसर्या क्रमांकावर आहे. त्याने 1622 चेंडूंमध्ये 100 विकेट पूर्ण केल्या आहेत.
Rabada IPL Record : कगिसो रबाडाची आयपीएलमधील कारकीर्द
कगिसो रबाडा दक्षिण आफ्रिकन खेळाडू आहे. कगिसो रबाडाने 2018 साली दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. रबाडा आयपीएलमध्ये आतापर्यंत 64 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 100 विकेट घेतल्या असून त्याची सरासरी 19.84 आहे. रबाडाची आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी करत एका सामन्यात 21 धावांत 4 बळी घेतले होते. यंदाच्या मोसमात पंजाब किंग्सने रबाडाला आयपीएल मिनी लिलावात 9.25 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :