Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
महा कुंभमेळा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण 1.36 कोटी भाविकांनी गंगा आणि संगमात स्नान केले आणि 13 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 52.83 कोटी भाविकांनी संगमात स्नान केले आहे.

Mahakumbh 2025 : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी 19 फेब्रुवारीला महाकुंभाला जाणार असल्याचा दावा काँग्रेस नेते अजय राय यांनी केला आहे. यावेळी अजय राय यांनी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीवरून केंद्र सरकारवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, "ही दुःखद घटना आहे. ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही सर्वांना बोलावले, पण व्यवस्था नाही." अजय राय म्हणाले की, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.
आम्ही सर्वजण 19 फेब्रुवारीला महाकुंभला जाणार आहोत
इटावामध्ये अजय राय म्हणाले की, "राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत आम्ही सर्वजण 19 फेब्रुवारीला महाकुंभला जाणार आहोत. तिथे हर हर महादेव असेल." महाकुंभात स्नान करण्यासाठी जगभरातून भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत. महाकुंभाच्या समारोपाला फार दिवस उरलेले नाहीत. त्याची मुदत 26 मार्च रोजी संपत आहे. महा कुंभमेळा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी (15 फेब्रुवारी 2025) रात्री 8 वाजेपर्यंत एकूण 1.36 कोटी भाविकांनी गंगा आणि संगमात स्नान केले आणि 13 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 52.83 कोटी भाविकांनी संगमात स्नान केले आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. फूटओव्हर ब्रिजवरून उतरताना काही प्रवासी घसरून इतरांवर पडल्याची घटना घडली.
प्रयागराज (जिथे महाकुंभ आयोजित केला जातो) जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 वर प्रवाशांची गर्दी जमली होती, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. काँग्रेससह संपूर्ण विरोधक रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या घटनेवर शोक व्यक्त करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मोदी सरकार मृत्यूचे सत्य लपविण्याचा प्रयत्न करत आहे, हे अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, "या घटनेने रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता स्थानकावर चांगली व्यवस्था करायला हवी होती."
इतर महत्वाच्या बातम्या




















