एक्स्प्लोर

धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...

कोण कुणाला भेटलं याच्यावर राजकारण होत असेल तर ते लोकशाहीमध्ये योग्य नाही, लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे.

जळगाव : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर खंडणी प्रकरण आणि हत्याप्रकरणावरुन आमदार सुरेश धस (Suresh dhas) यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत आरोपींच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर, आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण या प्रकरणातून हटणार नाही, असे म्हणत आमदार धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवरही आरोप केले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त माध्यमांत झळकल्यानंतर सोशल मीडियातून आणि विरोधकांकडून सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. विशेष म्हणजे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही धस यांच्यावर हल्लाबोल करत धस यांनी दगाफटका केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, आमदार धस आणि मंत्री यांच्या भेटीनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत, तर सत्ताधारी आपली बाजू मांडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या भेटीवर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जळगाव येथील पत्रकारांनी या भेटीच्या अनुषंगाने प्रश्न केला होता. त्यावर, या भेटीनं कुठलाही फरक पडत नाही, असे म्हटले.  

कोण कुणाला भेटलं याच्यावर राजकारण होत असेल तर ते लोकशाहीमध्ये योग्य नाही, लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे. बीडमधील हत्याप्रकरणात मी खंबीर भूमिका घेतलेली आहे.  खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवाद तोडून टाकायचा असं करण्याची आवश्यकता नाही. धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत, एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटल्याने कुठलाही फरक पडत नाही. सुरेश धस यांनी देखील सांगितला आहे की, भेट घेतली तरी हेतू एकच आहे की सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. तोच हेतू घेऊन सुरेश धस काम करत आहेत. मात्र, काही लोकांच्या पोटात दुखते, त्यामुळे ते यावर टीका करतात, अशी पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीवर दिली आहे.  

जरांगे पाटील यांची भेटीवर टीका

दरम्यान, वाल्मिक कराड, सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे एकच आहेत, ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि व्यापार केला, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंडे-धस भेटीवर टीका केली होती. त्यानंतर, सुरेश धस यांनीही सर्वच बाजुंनी होणाऱ्या टीकेवर बोलताना माझ्याविरुद्ध षडयंत्र रचलं जात असल्याचे म्हटले. मात्र, धस यांच्याविरुद्ध षडयंत्र रचण्याचा विषयच येतो कुठे, तुम्ही भेटायला गेले आता सपादनी करू नका, अशा शब्दात मनोज जरांगे यांनीही सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. तसेच, तुम्ही मराठ्यांची जी फसवणूक करायची नव्हती ती केली, गोड बोलून तुम्ही मराठ्यांचे मुंडके मोडून टाकले, ही अपेक्षा नव्हती, असेही पाटील यांनी म्हटले. 

हेही वाचा

शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
Suresh Dhas & Satish Bhosale : सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojna | उद्या लाडक्या बहि‍णींचा हप्ता जमा होणार- आदिती तटकरेABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03PM 07 March 2025Rohit Sharma School Update | रोहित शर्माच्या शाळेतील तोडलेलं क्रिकेट टर्फ पुन्हा बांधून देणार, म्हाडाकडून हमी सुपूर्दNitesh Rane | हे कसली तक्रार करतात, यांनी लोकांचे छळ केले; अनिल परब VS नितेश राणे यांच्यात खडाजंगी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींनी बोलवली 'विशेष ग्रामसभा'; महिला सुरक्षेचा ठराव मांडणार
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
मंदिरातील पुजारी अन् कुंभमेळ्यातील साधू पूर्ण कपड्यात असतात का? जरांगेंनी दाखवलेल्या व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंचा सवाल
Suresh Dhas & Satish Bhosale : सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
Babita Tade : KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या
कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या
Embed widget