(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mohit Sharma IPL : तब्बल 3 वर्षानंतर IPL मध्ये पुनरागमन, दमदार खेळी करत ठरला 'प्लेअर ऑफ द मॅच'; मोहित शर्माचा धुव्वाधार कमबॅक
Mohit Sharma Returns in IPL : तीन वर्षांनंतर मोहित शर्माचं आयपीएलमध्ये (IPL) पुनरागमन केलं आहे. या सामन्यात दोन विकेट घेत तो 'सामनावीर' (Player of The Match) ठरला.
Mohit Sharma Comeback IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL 2023) 18 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) शेवटच्या चेंडूवर रोमांचक लढतीत विजय मिळवला. गुजरातने पंजाबचा (PBKS) 6 गडी राखून पराभव केला. कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात विजयासह गुजरातने जोरदार पुनरागमन केलं आहे. कर्णधार हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत संघाने कोलकाता विरुद्धचा मागील सामना गमावला होता. त्यानंतर गुजरात संघाने पंजाब विरुद्धच्या सामन्यात आपल्या प्लेइंग 11 मध्ये काही मोठे बदल केले होते. मागील सामन्यात खलनायक ठरलेल्या यश दयालला या सामन्यात संधी दिली नाही. यश दयाल ऐवजी गुजरात संघाने मोहित शर्माला संधी दिली.
मोहित शर्माचं तीन वर्षानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन
मोहित शर्माकडे (Mohit Sharma) एकेकाळी धोनीच्या चेन्नई संघाने देखील दुर्लक्ष केलं होतं. त्याच खेळाडूला हार्दिक पांड्याने संधी दिली. या सामन्यात आयपीएलमध्ये मोहित शर्माचे पुनरागमन झालं. मोहित शर्मा तीन वर्षानंतर आयपीएलमध्ये परतला. आयपीएल 2023 च्या गुरुवारी (13 एप्रिल) रात्री झालेल्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मोहित शर्माने निर्णायक भूमिका बजावली. गुजरात टायटन्सच्या या गोलंदाजाने पंजाब किंग्सविरुद्ध चार षटकांत अवघ्या 18 धावांत दोन बळी घेतले. त्याच्या गोलंदाजीमुळे पंजाबचा संघ केवळ 153 धावाच करू शकला. या लक्ष्याचा पाठलाग करणं गुजरात संघाला फारसं अवघड नव्हतं.
A POTM performance on his GT debut 🥳⚡ Mohit Sharma is our @BKTtires Commander of the Match 💪💙#AavaDe | #PBKSvGT | #TATAIPL 2023 pic.twitter.com/DC6vgWyi72
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 14, 2023
मोहित शर्मा ठरला 'सामनावीर'
गुजरात टायटन्सने पंजाब विरुद्धचा सामना 6 गडी राखून जिंकला. या सामन्यात मोहित शर्मा 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात मोहित शर्माने गुजरातसाठी चमकदार कामगिरी केली. या सामन्यात त्याने 4 षटकात 18 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. मोहितने कर्णधार हार्दिक पांड्याचा विश्वास सार्थ ठरवला. विशेष म्हणजे मोहित शर्मा (Mohit Sharma) गेल्या आयपीएल (IPL 2022) हंगामात नेच बॉलर (Net Baller) होता.
पांड्याने मोहित शर्माला दिली संधी
मोहित शर्माने तब्ब्ल तीन वर्षानंतर आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. याआधी मोहित आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासाठी शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर आता तीन वर्षानंतर मोहितनं आयपीएलमध्ये दमदार पदार्पण केलं आहे. या सामन्यात त्याच्या दमदार कामगिरीसाठी त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आलं. .
2013 मध्ये आंतरराष्ट्रीय किक्रेटमध्ये पदार्पण
मोहित शर्माने 2013 मध्येच आंतरराष्ट्रीय किक्रेटमध्ये पदार्पण केलं. तो एकेकाळी टीम इंडियाच्या वनडे संघाचा महत्त्वाचा भाग होता. 2013 ते 2015 दरम्यान, त्याने भारतीय संघासाठी 26 एकदिवसीय सामने खेळले. मोहितने आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 37 विकेट घेतल्या आहेत. स्फोटक गोलंदाजीमुळे मोहितचं आयपीएल 2013 मध्ये पदार्पण झालं होतं.
धोनीने चेन्नई संघासाठी केली निवड
मोहित शर्मा 2012-13 रणजी मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा पाचवा गोलंदाज ठरला होता. त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे त्याला धोनीने चेन्नई संघात स्थान दिलं होतं. आयपीएल 2013 (IPL 2013) मध्ये तो चेन्नई संघाचा भाग होता. मोहितने आयपीएलच्या पहिल्या सत्रात 20 विकेट घेतल्या होत्या. याच कारणामुळे त्याला यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :