एक्स्प्लोर
Gautam Gambhir Wife Natasha : पावसाळ्यात गौतम गंभीर झाला रोमँटिक; छत्री घेऊन पाहत होता पत्नीची वाट, म्हणाला...
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले आहे. गौतम गंभीर सध्या क्रिकेटच्या सुट्टीवर आहे.

Gautam Gambhir Wife Natasha
1/6

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले आहे. गौतम गंभीर सध्या क्रिकेटच्या सुट्टीवर आहे.
2/6

गेल्या अनेक दिवसांपासून तो पत्नीसोबतचे फोटो शेअर करत आहे. यादरम्यान गौतम गंभीरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या पत्नीची खास वाट पाहत आहे.
3/6

गौतम गंभीरने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. फोटोत तो छत्री घेऊन उभा आहे. रोमँटिक स्टाईलमध्ये पोस्ट शेअर करताना त्याने कॅप्शन लिहिले की, 'जर तुमच्या जोडीदाराने पावसात बाहेर जायचे ठरवले तर तुम्हाला त्याचे स्वागत करण्यासाठी छत्री घेऊन थांबावे लागेल.
4/6

गौतमच्या या पोस्टवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आतापर्यंत या पोस्टला सुमारे 116.437 लाईक्स मिळाले आहेत. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे 10 मिलियन फॉलोअर्स आहेत.
5/6

गौतम गंभीरच्या पत्नीचे नाव नताशा गंभीर आहे. गंभीर आणि नताशा यांची पहिली भेट 2007 मध्ये एका पार्टीदरम्यान झाली होती. मात्र, पहिल्या नजरेतील प्रेमासारखे काही घडले नाही. त्या पार्टीनंतर दोघांचे कुटुंब एकमेकांना लग्नासाठी भेटले. हळूहळू गोष्टी पुढे सरकल्या आणि दोघेही एकमेकांना आवडू लागले.
6/6

लग्नापूर्वी गंभीरने नताशासमोर एक अट ठेवली होती की 2011च्या वनडे वर्ल्डकपनंतरच लग्न करेन. त्यानंतर 2011 मध्ये वर्ल्ड कपनंतर गंभीर आणि नताशाचे लग्न झाले. गंभीर आणि नताशा हे दोन मुलांचे पालक आहेत. मोठ्या मुलीचे नाव आजीन आणि लहान मुलीचे नाव अनैजा आहे.
Published at : 27 Aug 2024 07:58 PM (IST)
Tags :
Gautam Gambhirअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
