एक्स्प्लोर
Champions Trophy 2025 Tickets : भारत-पाकिस्तान मॅचचं तिकीट फक्त 3 हजारात, पण खरेदी कसं करायचं? जाणून घ्या नेमकं काय करावं?
भारतीय संघ हायब्रिड मॉडेल अंतर्गत दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळणार आहे.

ICC Champions Trophy Ind vs Pak Tickets
1/9

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार 19 फेब्रुवारीपासून रंगणार आहे.
2/9

भारतीय संघ हायब्रिड मॉडेल अंतर्गत दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळणार आहे.
3/9

आता आयसीसीने एक अपडेट दिले आहे की, दुबईमध्ये होणाऱ्या सामन्यांची तिकिटे 3 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध असतील. तुम्ही आयसीसीच्या अधिकृत वेबसाइट https://www.iccchampionstrophy.com/tickets ला जाऊन देऊन ऑनलाइन तिकिटे बुक करू शकता.
4/9

आयसीसीने असेही म्हटले आहे की, सौदी अरेबियाच्या चलनात सर्वात स्वस्त तिकीट 125 दिरहम इतके असेल. हे भारतीय चलनात सुमारे 3 हजार रुपय आहेत.
5/9

पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री गेल्या मंगळवारपासून सुरू झाली. ज्यांना ऑफलाइन तिकिटे खरेदी करायची आहेत, ते चाहते 3 फेब्रुवारीपासून पाकिस्तान वेळेनुसार दुपारी 4 वाजेपासून तिकिटे खरेदी करू शकतात.
6/9

ही तिकिटे जगभरातील 26 शहरांमधील टीसीएस केंद्रांवर उपलब्ध असतील. पहिला उपांत्य सामनाही दुबईमध्ये खेळला जाणार आहे.
7/9

आयसीसीने एक अपडेट दिले आहे की, अंतिम सामन्याच्या तिकिटांची किंमत पहिल्या उपांत्य फेरीच्या समाप्तीनंतर विक्रीसाठी उपलब्ध असेल.
8/9

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जगातील आठ सर्वोत्तम संघ सहभागी होतील. 19 दिवस चालणाऱ्या या आयसीसी स्पर्धेत एकूण 15 सामने होतील.
9/9

सर्व 8 संघांना प्रत्येकी चार संघांच्या 2 गटात विभागण्यात आले आहे. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांना गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे.
Published at : 03 Feb 2025 01:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion