Mohammed Siraj dismisses Rohit Sharma : इथला बादशाह फक्त मीच... DSP सिराज समोर 'हिटमॅन'ची बोलती बंद, रोहित शर्माचा व्हिडिओ तुफान व्हायरल
अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल सामन्यात मोहम्मद सिराज धुमाकूळ घालत आहे.

Mohammed Siraj dismisses Rohit Sharma GT VS MI IPL : आयपीएल 2025 चा हंगाम अशा अनेक खेळाडूंसाठी महत्त्वाचा आहे, ज्यांना भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवायचे आहेत. अलिकडच्या काळात संघाबाहेर असलेले अनेक भारतीय खेळाडू आहेत. काही काळापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये निवड न झालेल्यांपैकी मोहम्मद सिराज देखील एक आहे. अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल सामन्यात मोहम्मद सिराज धुमाकूळ घालत आहे. त्याने रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले, ज्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होते आहे.
Miyan Bhai on fire in Ahmedabad, he picks up the wickets of Rohit Sharma and Ryan Rickelton 🔥
— Saabir Zafar (@Saabir_Saabu01) March 29, 2025
He does the CR7 celebration after picking the wickets 🥶👌
Mohammed Siraj 🫡#MohammedSiraj #MIvGT #GTvMI #IPL2025 #TATAIPL2025 pic.twitter.com/4UpwNcwpx6
रोहित शर्माची खराब फॉर्मशी झुंज....
मुंबई इंडियन्सचा स्टार आणि माजी कर्णधार रोहित शर्मा आयपीएल 2025 मध्ये खराब फॉर्मशी झुंजत आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात तो शून्य धावांवर आऊट झाला होता, तर आता गुजरातविरुद्ध खेळताना रोहितने 4 चेंडूत 8 धावा काढून आपली विकेट दिली. मोहम्मद सिराजच्या सलग दोन चेंडूंवर रोहित शर्माने दोन चौकार मारले पण तिसऱ्या चेंडूवर सिराजने त्याला क्लीन बोल्ड केले. रोहित शर्मा 8 धावांवर बाद होताच सोशल मीडियावर त्याचे ट्रोलर्स त्याच्याबद्दल ट्विट आणि मीम्स बनवू लागले. रोहित शर्माला आऊट केल्यानंतर सिराजने हातवारे करत भन्नाट सेलिब्रेशन केले.
4, 4, 𝐖 💥#MohammedSiraj dismissed #RohitSharma for the first time in #T20s & what a way to do it!
— Star Sports (@StarSportsIndia) March 29, 2025
Watch the LIVE action ➡ https://t.co/VU1zRx9cWp #IPLonJioStar 👉 #GTvMI | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi, & JioHotstar! pic.twitter.com/x2mnv2YWUI
एकीकडे रोहित शर्मा लवकर आऊट, दुसरीकडे मोठी कामगिरी!
एकीकडे रोहित शर्मा लवकर आऊट झाला, पण दुसरीकडे त्याने मोठी कामगिरी केली आहे. या सामन्यापूर्वी रोहितने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 599 चौकार मारले होते. गुजरातविरुद्ध चौकार मारून तो आयपीएलच्या इतिहासात 600 किंवा त्याहून अधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूंपैकी एक बनला. रोहित आयपीएलमध्ये 600 किंवा त्याहून अधिक चौकार मारणारा चौथा खेळाडू ठरला आहे.
Mohammed Siraj Cleans up Rohit Sharma. 🔥#GTvMI #MIvsGT pic.twitter.com/cIfLWqMXKD
— Akshat Om (@AkshatOM10) March 29, 2025
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. त्याने 222 सामन्यांमध्ये 768 चौकार मारले आहेत. विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 711 चौकार मारले आहेत. डेव्हिड वॉर्नर 663 चौकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आता रोहित शर्मा 601 चौकारांसह चौथा खेळाडू बनला आहे.
हे ही वाचा -





















