एक्स्प्लोर
Gudhi Padwa 2025: आई तुळजाभवानी देवीच्या शीखरावर महाराष्ट्रातील पहिली गुढी उभारली, PHOTOS
Gudhi Padwa 2025: तुळजाभवानी मंदिरावर गुढी उभारल्यानंतर तुळजापुरात घरोघरी उभी राहते गुढी
Gudhi Padwa
1/7

नववर्षाची महाराष्ट्रातील पहिली गुढी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या कळसावर उभारण्यात आली. विधिवत पुजाकरत देवीच्या महंत, पुजाऱ्यानी गुढी उभारली.
2/7

साडेतीन शुभ मुहूर्त पैकी आजचा एक शुभ मुहूर्त असल्याने व मराठी नवीन वर्षाची आज सुरुवात होत असल्याने देवीची शिवकालीन दागिने घालुन अलंकार पुजा करण्यात आली.
3/7

देवीची पहाटे 5 वाजता आरती करुन तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर विधीवत पुजा करुन गुढी उभारण्यात आली.
4/7

तुळजापूर मंदीरावर गूढी उभारण्यात आल्यानंतर तुळजापूर शहरात नागरीक गुढी उभी करतात.
5/7

दरम्यान पुढच्या वर्षीची गुढी ही मंदीराच्या शिखरावर उभी राहु दे अशी प्रार्थना गुढी समोर महंतानी केलीय.
6/7

तुळजाभवानी मातेचे मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा,वाकोजी बुवा यासह पुजारी भक्तांच्या उपस्थितीत गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण केला. तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
7/7

देवीच्या विधिवत पुजा आज पार पडल्या. देवीला गुढी पाडव्याला खास साखरेचा हार ही घालण्यात आला.
Published at : 30 Mar 2025 06:55 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























