नामदेव शास्त्रींचा पाठिंबा मिळाला आता नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगला येणार, धनंजय देशमुखांसह कुटुंबियांच्या भेटीत काय ठरणार?
आज नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि देशमुख कुटुंबीयांची मस्साजोग गावात जात भेट घेणार आहेत.

Beed: संतोष देशमुख हत्या प्रकरणात भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रकरण चांगलेच तापले आहे. बीडसह राज्यातील राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असताना आता मस्साजोग प्रकरणात नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज(Mahant Shivaji Maharaj) यांची एन्ट्री होत आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा ही मागणी जोर धरू लागलेली असताना भगवानगडच्या नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे निर्दोष असल्याचे सांगत त्यांना पाठिंबा दर्शवला. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने बराच खल झाला. नंतर नामदेव शास्त्रींनीही भगवानगड देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचा जाहीर केलं. आता बीडच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाच्या नारायणगडाचे(Narayangad) महंत शिवाजी महाराज आज संतोष देशमुख कुटुंबीयांची मस्साजोगमध्ये येऊन भेट घेणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितलं.
दरम्यान एकीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे धनंजय देशमुख यांनी फरार आरोपी विष्णू चाटेच्या फोनबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय. विष्णू चाटे चा मोबाईल मिळायला हवा त्यातून अनेक वरिष्ठांना फोन गेलेत. या प्रकरणातून कसं वाचायचं हे फोनवर बोललं गेलंय. असंही धनंजय देशमुख म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नामदेव शास्त्रीनंतर मस्साजोग प्रकरणात नारायणगडचा महंतांची एन्ट्री
भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना निर्दोष असल्याचे सांगत पाठिंबा दिल्यानंतर धनंजय देशमुख यांनी भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली. त्यांनी भगवानगड देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचा जाहीर केल्यानंतर आता नामदेव शास्त्रीनंतर मस्साजोग प्रकरणात नारायणगडचा महंतांचे एन्ट्री होणार आहे. काही दिवसांपूर्वी देशमुख कुटुंबीयांनी नारायण गडावर जाऊन दर्शन घेतलं. मात्र काही नियोजित कार्यक्रमांमुळे महंत शिवाजी महाराजांची भेट झाली नाही. परंतु आज नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि देशमुख कुटुंबीयांची मस्साजोग गावात जात भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान महंत शिवाजी महाराज आणि देशमुख कुटुंबीयांमध्ये काय बोलणं होतं ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बीडच्या राजकीय घडामोडींचे केंद्र
बीडचा राजकीय इतिहासात नारायण गडाचे मोठे महत्त्व आहे. बीड तालुक्यातील नारायण गड येथील नगद नारायण यांचा गड सगळ्या समाजातील बालकांसाठी प्रसिद्ध आहे पण यामध्ये मराठा समाजातील भाविक मोठ्या प्रमाणावर या गडावर येतात. त्यामुळेच मनोज जरंगे पाटील यांनीही त्यांच्या आंदोलनाची सुरुवात याच गडाचे दर्शन घेऊन केली होती. या गडाचे महंत शिवाजी महाराज यांचा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मोठी भूमिका राहिली आहे. बीड जिल्ह्यातील अनेक राजकीय घडामोडींचे केंद्र म्हणून नारायण गडाकडे पाहिले जाते.
हेही वाचा:
Walmik Karad: वाल्मिक कराडला दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम आणखी 14 दिवस वाढणार























