Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates: संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात आणखी एक नाव समोर आलं आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांना मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा अँगल समोर आला आहे. वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक चणचणीतून आत्महत्या असा पोलिसांनी निष्कर्ष काढला आहे. मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्येही दिशा सालियनची आत्महत्याच असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यासह दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नांदेडमध्ये दाजी भाऊजींच्या राजकारणाला रंगत
AR- नांदेडमध्ये दाजी भाऊजीच्या राजकारणाला आता रंगत आलीय, आठच
दिवसांपूर्वी जंगी शक्ती प्रदर्शन करत भास्करराव खतगांवकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्याच नरसी शहरात आज अशोकराव चव्हाण यांचे जेसीबी द्वारे फुले उधळत स्वागत करण्यात आले. चव्हाण यांची मिरवणूक काढत भाजपने मोठे शक्तिप्रदर्शन केलय. या शक्तिप्रदर्शना तुन नायगाव नरसी मतदासंघ हा भाजपचा बाल्लेकिल्ला आहे हे या शक्तीप्रदर्शनातून अशोक चव्हाण यांनी दाखवून दिले त्यामुळे भोकर प्रमाणे अशोक चव्हाण यांनी आपले लक्ष आता नायगाव मतदारसंघात देखील वाढवले आहे कि काय अशी चर्चा सुरु झाली आहे
अशोक चव्हाण यांच्याकडून अजितदादांच्या भूमिकेचे समर्थन
अशोक चव्हाण यांच्याकडून अजितदादांच्या भूमिकेचे समर्थन
सध्या शेतकरी कर्जमाफी सारखी परिस्थिती नाही
छत्रपती शिवाजी महाराजांना एका जातीपुरत मर्यादित ठेवणे अयोग्य
AR: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजा बद्दल केलेलं वक्तव्य योग्यच असल्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलय. त्याच बरोबर राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून जे वास्तव आहे तेच ते बोलत आहेत असेही चव्हाण म्हणाले. आगामी 3 वर्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य नसल्याचे वक्तव्य अजितदादानी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देतांना चव्हाण यांनी आश्वासनाची पूर्तता योग्य वेळी होईल पण आज तशी परिस्थिती नसावी असे सांगितलंय.























