एक्स्प्लोर

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बेस्टचा मोठा निर्णय, ईदच्या दिवशी 128 ज्यादा बसगाड्या चालवण्यात येणार

येत्या सोमवारी म्हणजे 31 मार्चला रमजान ईद (Eid) साजरी करण्यात येणार आहे. तर  मंगळवारी बासी ईद साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवाकडून तयारी करण्यात येत आहे

मुंबई: येत्या सोमवारी म्हणजे 31 मार्चला रमजान ईद (Eid) साजरी करण्यात येणार आहे. तर  मंगळवारी बासी ईद साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवाकडून तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, या दिवशी मुंबईतील विविध भागांत मोठ्या प्रमाणात रहदारी असते. यामुळं नागरिकांच्या सोयीसाठी बेस्ट (BEST) उपक्रमातर्फे 128 ज्यादा बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, बेस्ट प्रशासनाचं आवाहन 

बासी ईदच्या दिवशी मोहम्मद अली रोड, हाजी अली, शिवाजी नगर, अंधेरी, जुहू चौपाटी, मालवणी, जोगेश्वरी, माहीम, धारावी, ॲन्टॉप हिल या भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होते. नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा उत्तम पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही बेस्टकडून अतिरिक्त बससेवा पुरवण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासनाने प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. ज्यादा बसगाड्यांमुळे प्रवाशांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल, असा विश्वास बेस्टने व्यक्त केला आहे.

भिवंडीत रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी

रमजान ईद आणि गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असून, खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. भिवंडीतील तीन बत्ती, जुना बाजार, शेठ नाका आणि इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधव नवीन कपडे, घरगुती वस्तू आणि खाद्यपदार्थ खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाले आहेत. महिलांसाठी ड्रेस मटेरियल, साड्या, कॉस्मेटिक्स आणि दागिने यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच लहान मुलांसाठी नवीन कपडे, चप्पल आणि खेळणी घेण्यासाठीही पालकांची लगबग सुरु आहे.

नागरिकांची गर्दी पाहता पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त 

 ‘लाडकी बहिण योजना’ अंतर्गत मिळालेल्या आर्थिक सहाय्याचा लाभ अनेक महिलांनी घेतला आहे. या योजनेंतर्गत मिळालेल्या रकमेतून अनेक महिलांनी उत्साहाने खरेदी करत बाजारात गर्दी वाढवली आहे. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ असल्याने पारंपरिक वेशभूषा, सुवासिक उटणे, गंध, तोरणे आणि पूजेच्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे. त्यामुळे बाजारात सणासुदीचे वातावरण पाहायला मिळत आहे. नागरिकांची गर्दी पाहता पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये पोलिसांची तैनाती वाढवण्यात आली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गस्त वाढवण्यात आली आहे.

रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या खरेदीमुळे बाजारपेठा फुलल्या

रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या खरेदीमुळे बाजारपेठा फुलल्या असून, व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांपासून मंदीचा सामना करणाऱ्या व्यावसायिकांना या सणांच्या निमित्ताने मोठा दिलासा मिळाला आहे. भिवंडी शहरात एकाच वेळी दोन मोठे सण येत असल्याने संपूर्ण बाजारपेठांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Mumbai BEST bus: मुंबईतील 'बेस्ट'चे तिकीट दर दुप्पट होणार? साध्या बस आणि एसी बसचे भाडे किती रुपयांनी वाढणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar Land Scam : पार्थ पवारांनी अमेडिया कंपनीसाठी जिजाई बंगल्याचा पत्ता दिला
Dhurla Nivdnukicha : राष्ट्रवादीतील भिंत कोसळणार? दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत
Dhurla Nivdnukicha : महायुतीत बिघाडी? स्थानिक निवडणुकीवरून नेत्यांचे स्वबळाचे इशारे
Pawar Land Scam: 'अजित दादांनी राजीनामा दिला पाहिजे', MNS कडून पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Parth Pawar Land Scam: 'अजित पवारांनी राजीनामा द्यावा', Parth Pawar यांच्यामुळे विरोधक आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
Parth Pawar : पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
Narendra Patil on Ajit Pawar and Chhagan Bhujbal: अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
अजित पवारांचं टेन्शन आणखी वाढणार? छगन भुजबळांचं नाव घेत नरेंद्र पाटलांचा खळबळजनक आरोप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या खळबळजनक आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
Embed widget