Gudi Padwa Wishes 2025 : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
Gudi Padwa Wishes 2025 : गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून घरावर गुढी उभारतात. तसेच, घरात सुख, शांती, समृद्धी राहावी आणि येणारं नवं वर्ष आनंदात आणि सुखात जावं यासाठी प्रार्थना केली जाते.

Gudi Padwa Wishes 2025 : दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा (Gudi Padwa) साजरा करण्याची परंपरा आहे. साडेतीन मुहूर्तांपेकी एक म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. त्यानुसार यंदा गुढीपाडव्याचा सण 30 मार्च 2025 रोजी साजरा केला जाणार आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून घरावर गुढी उभारली जाते. तसेच, घरात सुख, शांती, समृद्धी राहावी, घराला चांगले आरोग्य लाभावे आणि येणारं नवं वर्ष आनंदात आणि सुखात जावं यासाठी प्रार्थना केली जाते. आणि सण समारंभ म्हटला की नातेवाईकांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देणं आलंच. तुम्हीही घर बसल्या तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना गुढीपाडव्याचे संदेश पाठवून खास शुभेच्छा देऊ शकता, त्यासाठी काही शुभेच्छा संदेश.
गुढीपाडवा शुभेच्छा संदेश 2025 (Gudi Padwa Wishes 2025)
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट...
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा-आकांशा,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरुवात…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
पालवी चैत्राची अथांग स्नेहाची,
जपणूक परंपरेची,
उंच उंच जाऊ दे गुढी
आदर्शाची, संपन्नतेची,
उन्नतीची आणि स्वप्नपूर्तीची!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
राग-रुसवे विसरुन
वाढवा नात्यातला गोडवा
एकत्र येऊन साजरा करुया
सण गुढीपाडवा...
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
काठीला गंध, फुलं, अक्षता
नैवेद्याला साखर, पेढा, दुधाचा लोटा
लावावे निरांजन, दाखवावी उदबत्ती
अभिमानाची गुढी दारी,
हीच खरी संपत्ती...
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दु:ख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरणी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू...
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रसन्नतेचा साज घेऊन,
येवो नवीन वर्ष,
आपल्या जीवनात नांदो,
समृद्धी, समाधान आणि ङर्ष
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :



















