एक्स्प्लोर
Sunil Gavaskar: शिवम दुबेला काहीच झालं नव्हतं; सुनील गावसकर सूर्यकुमार अन् गौतम गंभीरवर संतापले!
Sunil Gavaskar India vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने 4-1 अशा फरकाने मालिका जिंकली.

Ind vs Eng
1/9

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने 4-1 अशा फरकाने मालिका जिंकली. (Photo Credit- BCCI)
2/9

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पुण्यात झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात हर्षित राणाच्या गोलंदाजीवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. (Photo Credit- BCCI)
3/9

इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत पुण्याचे मैदान मारत टीम इंडियाने टी-20 मालिका खिशात घातली. या विजयाची खास गोष्ट म्हणजे प्लेइंग इलेव्हनचा भाग नसलेल्या खेळाडूच्या जोरावर भारतीय संघाने सामना जिंकला. (Photo Credit- BCCI)
4/9

शिवम दुबेच्या जागी बदली खेळाडूच्या रुपात आलेल्या हर्षित राणाने 3 विकेटस घेत टीम इंडियाच्या विजयात मोठा वाटा नोंदवला. मात्र या बदली खेळाडूवरुनच वाद निर्माण झाला. यावर आता भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी महत्वाचं विधान केलं आहे. (Photo Credit- BCCI)
5/9

सदर वादावर सुनील गावस्कर म्हणाले, पुण्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 मध्ये चेंडू शिवम दुबेच्या हेल्मेटला लागला, पण तो शेवटपर्यंत खेळत राहिला. यावरून स्पष्ट होते की त्याला दुखापत झाली नव्हती. त्यामुळे बदली खेळाडूला परवानगी देणे चुकीचे होते. (Photo Credit- BCCI)
6/9

शिवम दुबेने फलंदाजी पूर्ण केली होती. आता त्याचा बदली खेळाडू फक्त क्षेत्ररक्षण करू शकतो, गोलंदाजी करू शकत नाही, असं सुनील गावसकर म्हणाले. (Photo Credit-Sunil Gavaskar)
7/9

सोशल मीडियावर भारतीय संघावर बेईमानी केल्याचा आरोप होत आहे. एका व्यक्तीने म्हटले की अष्टपैलू खेळाडूची जागा फक्त एका अष्टपैलू खेळाडूने घ्यायला हवी होती. शिवम दुबे हा अष्टपैलू खेळाडू असल्याने, त्याच्या जागी पूर्णवेळ गोलंदाज हर्षित राणाला घेण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Photo Credit- BCCI)
8/9

कोणीतरी संपूर्ण भारतीय संघावर आणि विशेषतः मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर अनेक आरोप केले आहेत.(Photo Credit- BCCI)
9/9

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 150 धावांनी विजय मिळवला. (Photo Credit- BCCI)
Published at : 03 Feb 2025 03:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
