एक्स्प्लोर
Gongadi Trisha : लेकीच्या स्वप्नांसाठी नोकरी सोडली, आता त्याच त्रिशाने भारतात वर्ल्डकप आणला; देशाचा मान वाढवताच बापाची छाती अभिमानाने फुगली!
भारताच्या 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव करून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
Gongadi Trisha
1/7

इथेच त्रिशाचा क्रिकेटर बनण्याचा प्रवास वयाच्या 7 व्या वर्षी क्रिकेट अकादमीतून सुरू झाला आणि आज ती सलग दुसऱ्यांदा भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला.
2/7

यापूर्वी, या स्पर्धेची पहिली आवृत्ती 2023 मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि त्यानंतर शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन बनला होता. आता भारताने सलग दुसऱ्यांदा हा ट्रॉफी उचलून इतिहास रचला आहे.
3/7

भारतीय संघाच्या विजयांमध्ये युवा अष्टपैलू गोंगडी त्रिशा हिने मोलाचा वाटा उचलला. त्रिशाने पुन्हा एकदा अंतिम सामन्यात सर्वाधिक 44 धावा (नाबाद) केल्या.
4/7

अंतिम सामन्यात 44 धावांच्या खेळीपूर्वी तिने तिच्या फिरकी गोलंदाजीने 3 विकेट घेतले होते आणि म्हणूनच तिला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.
5/7

टी-20 वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणारी पहिली फलंदाज ठरलेल्या त्रिशाने संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक 309 धावा केल्या, जो एक नवीन विक्रम आहे. याशिवाय, तिने स्पर्धेत 7 विकेट्स घेतल्या आणि म्हणूनच ती स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.
6/7

त्रिशाचे हे विक्रम येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत लक्षात राहतील पण सर्वात मोठा त्याग तिच्या वडीलांनी केला. त्रिशाचा जन्म तेलंगणा (तेव्हाचे आंध्र प्रदेश) मधील भद्राचलम या छोट्याशा गावात झाला. तिचे वडील शहरातील एका खाजगी कंपनीत फिटनेस ट्रेनर होते.
7/7

पण त्रिशाला लहान वयात क्रिकेट खेळताना पाहून त्याने आपल्या मुलीचे हे स्वप्न साकार करण्यास मदत केली. वडिलांनी नोकरी सोडली आणि नंतर भद्राचलम सोडले आणि सिकंदराबाद या मोठ्या शहरात स्थलांतरित झाले.
Published at : 02 Feb 2025 03:44 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























