एक्स्प्लोर

Pragya Singh Thakur : अखेर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर गुढी पाडव्याला मालेगावात जाणार; उच्च न्यायालयाची 'त्या' कार्यक्रमाला परवानगी

Pragya Singh Thakur : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत मालेगावात

Pragya Thakur : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या उपस्थितीत मालेगावात (Malegaon News) होणाऱ्या विराट हिंदू संत संमेलनाला (Hindu Sant Sammelan) अखेर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सशर्त परवानगी दिली असून, कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही तसेच प्रक्षोभक भाषण न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे मालेगावच्या यशश्री कंपाऊंडमध्ये उद्या (दि.30) गुढीपाडव्याला (Gudi Padwa) दुपारी 1 ते 5 या वेळेत हिंदू संत संमेलन पार पडणार असून त्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

या संमेलनात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना 'हिंदू वीर' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी श्री. भारतानंद सरस्वती, ह. भ. प. संग्राम बापू भंडारे, हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे, जैन धर्मगुरु निलेशचंद्र महाराज हे देखील उपस्थित राहणार आहे. कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलीस व महसूल प्रशासनाने परवानगी नाकारली होती. आयोजकांनी त्यास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अखेर न्यायालयाने परवानगी दिल्याने आयोजक संमेलनाच्या तयारीला लागले आहेत. 

कार्यक्रमासाठी चार तासांची मर्यादा 

दरम्यान, न्यायालयाने कार्यक्रमास परवानगी दिली असली तरी काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. कार्यक्रम केवळ सकाळी 7 ते दुपारी 5 वाजेपर्यंत घेता येईल. आयोजकांनी पोलिसांना लेखी हमीपत्र द्यावे, ज्यात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची खात्री असेल. पोलिसांनी कार्यक्रमासाठी स्वतंत्र मार्ग आखावा आणि तो गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये याची दक्षता घ्यावी. नाशिक पोलिसांनी कार्यक्रमाला सुरक्षा पुरवावी, तसेच त्यासाठी आयोजकांकडून खर्च वसूल करायचा का, याचा निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी

2008 मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सात जण आरोपी आहेत, ज्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात त्यांना काही प्रमाणात सुट दिली गेली असून, सध्या त्यांच्यावर सुनावणी सुरू आहे. त्यांच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Santosh Deshmukh Case : टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!

Dhananjay Munde-Karuna Sharma: धनंजय मुंडेंनी करुणासोबत अधिकृत लग्न केलंच नाही, वकिलाचा युक्तिवाद; न्यायाधीश म्हणाले, मग मुलं कोणाची?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Pandharpur : उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
Santosh Deshmukh Case : टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर 29 March 2025 :3 PMABP Majha Headlines 3 PM Top Headlines 3 PM 29 March 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2 PM 29 March 2025ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1 PM 29 March 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Pandharpur : उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
Santosh Deshmukh Case : टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
Myanmar Thailand Earthquake Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Gold Price : गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
Nashik Crime : जमीन आमच्या नावावर केली नाही तर तुला अन् तुझ्या मुलींना संपवून टाकू; वृद्धाचं अपहरण करून जमीन बळकावली, नाशिकमधील धक्कादायक घटना
जमीन आमच्या नावावर केली नाही तर तुला अन् तुझ्या मुलींना संपवून टाकू; वृद्धाचं अपहरण करून जमीन बळकावली, नाशिकमधील धक्कादायक घटना
ATM मधून पैसे काढण्यापासून ते LPGच्या किमतीपर्यंत...1 एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम,थेट परिणाम होणार तुमच्या खिशावर, जाणून घ्या सविस्तर
ATM मधून पैसे काढण्यापासून ते LPGच्या किमतीपर्यंत...,1 एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम, थेट परिणाम होणार तुमच्या खिशावर
Embed widget