एक्स्प्लोर

Walmik Karad: वाल्मिक कराडला दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम आणखी 14 दिवस वाढणार

Walmik Karad: वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा कोठडीतील मुक्काम आणखी काही दिवस वाढणार आहे. वाल्मिक कराड याला 22 जानेवारी बीड विशेष न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत मंगळवारी संपत आहे. मात्र, वाल्मिक कराड (Walmik Karad) याला आज न्यायालयात हजर न करताच त्याची न्यायालयीन कोठडी आणखी 14 दिवसांनी वाढवली जाणार आहे. आज बीड कारागृहाकडून जेल वॉरंट कोर्टाला पाठवले जाईल. त्यानंतर न्यायालय वाल्मिक कराड यांची कोठडी आणखी 14 दिवसांनी वाढवून देईल. त्यामुळे आज वाल्मिक कराड किंवा त्यांचे वकील अशी कुठलीही सुनावणी कोर्टात होणार नाही. 

सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांची 9 डिसेंबरला केज तालुक्यात निर्घृणपणे हत्या झाली होती. वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरुन ही हत्या झाली, असा आरोप झाला होता. देशमुख यांच्या हत्येनंतर तब्बल 24 दिवस वाल्मिक कराड फरार होता. पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी अनेक पथके कामाला लावली होती. मात्र, तो पोलिसांच्या हाताला लागला नव्हता. अखेर वाल्मिक कराड 31 डिसेंबरला पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला होता. यानंतर वाल्मिक कराडचा पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी असा प्रवास सुरु झाला होता. यादरम्यान वाल्मिक कराड याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका लागल्याने त्याची इतक्यात तुरुंगातून सुटका होणे अवघड मानले जात आहे. 

दरम्यानच्या काळात वाल्मिक कराड याला बीड शहर पोलीस ठाण्यात आणि बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात आल्याचा आरोप झाला होता. बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीत होता. त्यावेळी पोलीस ठाण्यात पलंग आणण्यात आले होते. हे पलंग वाल्मिक कराडसाठी असल्याची चर्चा रंगली होती. यावरुन वाद निर्माण झाला होता. तेव्हा हे पलंग वाल्मिक कराड याच्यासाठी नसून ते पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असल्याचे सांगण्यात आले होते.  तसेच वाल्मिक कराड याची तब्येत बिघडल्यामुळे त्याला दोन दिवसांसाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी वाल्मिक कराड याला आरोपींसाठीच्या वॉर्डमध्ये न ठेवता सर्जिकल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. या आयसीयू कक्षात अनेक सोयीसुविधा होत्या. वाल्मिक कराड याच्यासाठी आयसीयू वॉर्डमधील पेशंट इतरत्र हलवण्यात आले होते. यावरूनही बराच वादंग झाला होता.

धनंजय देशमुखांचा बीड पोलिसांवर गंभीर आरोप

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केला आहे. कृष्णा आंधळेला पोलिसांनी वेळीच अटक केली असती तर आमच्या कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आली नसती. फरार असताना तो पोलिसांसोबत फिरत होता. विष्णू चाटेचा मोबाईल मिळाला पाहिजे त्यात अनेक व्हिडिओ आहेत, असा दावा धनंजय देशमुख यांनी केला. संतोष देशमुख यांना वाचवण्यासाठी मी अनेक वरिष्ठांना फोन केले. मी कोणता वरिष्ठ अधिकारी, कुणाचं नाव घेणार नाही, पण फोन मिळाल्यानंतर हे स्पष्ट होईल, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले.

आणखी वाचा

मोठी बातमी : धनंजय मुंडे रात्री 2 वाजता भेटले, वाल्मिक कराडही होते, सगळे पाया पडले, निवडणुकीपूर्वीच्या भेटीबाबत जरांगेंचा गौप्यस्फोट

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Embed widget