एक्स्प्लोर
Abhishek Sharma : टीम इंडियाचा नवा हिटमॅन अभिषेक शर्मा! रोहितचा मोडला 8 वर्षांचा जुना विक्रम
Abhishek Sharma breaks Rohit Sharma Records : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाचव्या टी-20 सामन्यात युवा सलामीवीर अभिषेक शर्माने धुमाकूळ घातला.

Abhishek Sharma breaks Rohit Sharma Records
1/8

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाचव्या टी-20 सामन्यात युवा सलामीवीर अभिषेक शर्माने धुमाकूळ घातला.
2/8

संजूची विकेट पडल्यानंतरही अभिषेकने तुफानी फटकेबाजी सुरूच ठेवली आणि फक्त 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकने भारतासाठी टी-20 मध्ये दुसरे सर्वात जलद अर्धशतक केले.
3/8

यानंतरही, तो येथेच थांबला नाही आणि 11 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अभिषेकने अवघ्या 37 चेंडूत शतक पूर्ण केले.
4/8

अशाप्रकारे तो रोहित शर्मानंतर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला. अभिषेक फक्त 3 चेंडूंनी रोहित शर्माचा सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम मोडू शकला नाही. रोहितने 35 चेंडूत शतक ठोकले होते.
5/8

त्याने 54 चेंडूत 135 धावा केल्या. त्याच्या वादळी शतकी खेळीत त्याने फक्त 7 चौकार आणि 13 गगनचुंबी षटकार मारले. अशाप्रकारे तो टी-20 मध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला.
6/8

अभिषेकने रोहित शर्माचा 8 वर्ष जुना विक्रम मोडला. 2017 मध्ये इंदूर येथे श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात रोहितने त्याच्या डावात 10 षटकार मारले होते.
7/8

अभिषेक शर्माची 135 धावांची खेळी ही टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. अभिषेकने शुभमन गिलचा विक्रम मोडला.
8/8

याआधी, सर्वात मोठी खेळी गिलच्या बॅटमधून आली होती. 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात गिलने नाबाद 126 धावा केल्या.
Published at : 02 Feb 2025 10:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
मुंबई
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
