एक्स्प्लोर

मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन महादेवाचे दर्शन घेतले होते.

नाशिक : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यानंतर आगामी सिंहस्थ कुंभमेळाची तयारी जोरदारपणे सुरू असून महायुती सरकारने याबाबत जबाबदारी निश्चित करायला सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये (Nashik) यंदाचा सिंहस्थ कंभुमेळा होत असून तत्पूर्वीच नाशिककर आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी समोरा आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला तिर्थक्षेत्राचा 'अ' दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे, येथील देवस्थानाच्या विकास आराखड्याला गती मिळणार असून भाविकांना (Devottee) देखील मोठ्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन महादेवाचे दर्शन घेतले होते. यावेळी, येथील तिर्थक्षेत्राची पाहणी करुन त्यांनी प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या होत्या. आता, त्र्यंबकेश्वर मंदिराला अ वर्ग दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे, भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. त्र्यंबकेश्वर येथे वर्षाला कोट्यवधी भाविक येत असतात. म्हणूनच पंढरपूरप्रमाणे नाशिक आणि त्र्यंबकला देखील शासनाच्या तीर्थक्षेत्र यादीत अ वर्ग दर्जा मिळाल्यास भाविकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळवून देता येतील, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. अखेर कुंभमेळ्यापूर्वी शासनाने हा निर्णय घेतला आहे. 

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र 'अ' दर्जा देण्यास नगर विकास खात्याने मंजुरी दिली आहे.  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थस्थान, निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळ, महाशिवरात्री, श्रावण महिन्यातील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आशा वेगवेगळ्या कारणाने वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे, तिर्थक्षेत्र अ दर्जा देण्याची मागणीही सातत्याने केली जात होती. विभागीय आयुक्तांकडून जानेवारी महिन्यात यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला होता. अखेर, या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष दर्जाचा भाविकांना व मंदिर प्रशासनाला फायदा होणार आहे. 

नाशिकमधील 6 तिर्थक्षेत्रांस ब वर्ग दर्जा

दरम्यान, याअगोदर 3 वर्षांपूर्वी ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 6 तिर्थक्षेत्रांना ब वर्ग दर्जा देण्यात आला आहे. त्यामध्ये, येवला तालुक्यातील कोटमगावचे जगदंबा देवस्थान, सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील रेणुका माता मंदिर, देवळा तालुक्यातील रामेश्वर मंदिर, निफाड तालुक्यातील श्री खंडेराव महाराज मंदिर आणि सुकेणे येथील श्री दत्त मंदिर व पिंपळगाव बसवंत येथील श्री राम मंदिर या देवस्थानचा ब वर्ग दर्जामध्ये समावेश करण्यात आला होता. 

हेही वाचा

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तश्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Darekar on Manoj Jarange Patil: 'फडणवीस एका व्यक्तीमुळे नाही, अठरापगड जातींच्या ताकदीवर मुख्यमंत्री झाले'; प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर पलटवार
'फडणवीस एका व्यक्तीमुळे नाही, अठरापगड जातींच्या ताकदीवर मुख्यमंत्री झाले'; प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर पलटवार
Nashik Crime News: कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Nashik Land Scam : शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
Chandrashekhar Bawankule: नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....
नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची-त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget