एक्स्प्लोर
Shubman Gill : सूर्यकुमार यादवपेक्षा 'फास्टर' निघाला शुभमन गिल, IPL मध्ये रचला इतिहास! गुजरातच्या मैदानात केला अनोखा रेकॉर्ड
या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
Shubman Gill becomes second-fastest to 1000 IPL runs at a venue
1/8

आयपीएल २०२५ चा नववा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला.
2/8

या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
3/8

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला आणि गिल या मैदानावर आयपीएलमध्ये 1000 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला.
4/8

गिलने नरेंद्र मोदी स्टेडियमवर या फॉरमॅटमध्ये तीन शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत.
5/8

शुभमन गिलने नरेंद्र मोदी स्टेडियमवर फक्त 20 डावात 1000 धावांचा टप्पा ओलांडला आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोणत्याही मैदानावर 1000 धावा करणारा सर्वात जलद भारतीय फलंदाज बनला.
6/8

यापूर्वी हा विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर होता. त्याने वानखेडेवर 31 डावात 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.
7/8

एकूण विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर, या बाबतीत फक्त ख्रिस गेल त्याच्या पुढे आहे, ज्याने बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर फक्त 19 डावात 1000 धावा केल्या.
8/8

गिल एकाच मैदानावर सर्वात जलद 1000 धावा करणारा दुसरा फलंदाजही बनला आहे.
Published at : 29 Mar 2025 10:07 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























