एक्स्प्लोर

Gudi Padwa : विकासाची महागुढी उभारू या, राष्ट्रधर्म वाढवू या! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Gudi Padwa : नूतन वर्ष सर्वांच्या जीवनात, सर्व क्षेत्रात नवचैतन्य, ऊर्जा घेऊन येवो अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठी नववर्ष प्रारंभ गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 

मुंबई: महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा अनन्यसाधारण आणि राष्ट्रधर्माचा वसा आहे. हा वसा घेऊन राज्याच्या, देशाच्या विकासाचा एकजुटीने निर्धार करूया. हा राष्ट्रधर्म वाढवू या, विकासाची महागुढी उभारू या! असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना मराठी नववर्ष प्रारंभ गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

नूतन वर्ष राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या जीवनात आणि उद्योजकता, व्यापार - उदीम अशा सर्वच क्षेत्रात नवचैतन्य, ऊर्जा घेऊन येवो. सर्वांकरिता सुख- समृद्धी, समाधान आणि भरभराटीचे क्षण घेऊन येवो, अशी मनोकामना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. 

गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी खंडप्राय भारतवर्षाचे वैभव वृद्धिंगत करण्याचा कळसाध्याय रचला. त्यांच्याकडून प्रखर राष्ट्रभक्ती- स्वराज्य, स्वधर्म आणि स्वाभिमानाची प्रेरणा मिळाली. शिवछत्रपतींच्या आशीर्वादाच्या छत्रछायेखाली महाराष्ट्राची वाटचाल  सुरू आहे. महाराष्ट्र आज शेती- सिंचन, शिक्षण - आरोग्य, उद्योग - गुंतवणूक, ऊर्जा - तंत्रज्ञान यांसह सामाजिक न्याय, महिला सबलीकरण तसेच साहित्य- कला- क्रीडा आणि सांस्कृतिकदृष्ट्या अग्रेसर आहे. या वाटचालीत अनेक थोरांचे, धुरिणांचे योगदान आहे. त्यांनी दिलेला हा राष्ट्रधर्माचा वसा आहे. हा वसा घेऊनच आपल्याला विकसित भारताचे स्वप्न - संकल्प साकार करण्यात विकसित महाराष्ट्र म्हणून वाटा उचलायचा आहे. त्यासाठी आपल्याला एकजूट आणि निर्धार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला हे नववर्ष निश्चितच प्रेरणादायी ठरेल. विकासाच्या संकल्पना, सामाजिक न्यायाच्या योजना, पायाभूत सुविधांचे महत्वकांक्षी प्रकल्प साकारण्यासाची ऊर्जा घेऊन येईल अशी मनोकामना व्यक्त करत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्यातील तरूणांच्या उद्योग - व्यवसायातील नवसंकल्पना, शिक्षण - तंत्रज्ञान आणि संशोधनांच्या पंखात भरारीचे बळ लाभावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. हे नववर्ष  नागरिकांच्या जीवनात धनधान्य, पशुधनाची समृध्दी आणि भरभराट घेऊन येवो, निसर्गाची कृपा घेऊन येवो, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Abitkar: महात्मा फुले योजनांचे पॅकेजस वाढवून दिलंय, लूटमार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती द्या, झटक्यात कारवाई करु, आबिटकरांनी ठणकावलं
महात्मा फुले योजनांचे पॅकेजस वाढवून दिलंय, लूटमार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती द्या, झटक्यात कारवाई करु, आबिटकरांनी ठणकावलं
Devendra Fadnavis Eknath Shinde Speech BDD Chawl: शिंदे म्हणाले, लोढांनी बांधली तशी घरं; फडणवीस म्हणाले, शिंदेंपेक्षा जास्त टाळ्या कोळंबकरांना, बीडीडीच्या चाव्या देताना काय घडलं?, VIDEO
शिंदे म्हणाले, लोढांनी बांधली तशी घरं; फडणवीस म्हणाले, शिंदेंपेक्षा जास्त टाळ्या कोळंबकरांना, बीडीडीच्या चाव्या देताना काय घडलं?, VIDEO
LPG e-KYC: घरगुती गॅस ग्राहकांसाठी e-KYC अनिवार्य, प्रक्रिया न केल्यास सबसिडी मिळणार नाही; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस
घरगुती गॅस ग्राहकांसाठी e-KYC अनिवार्य, प्रक्रिया न केल्यास सबसिडी मिळणार नाही; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस
Ambernath News : शिवसेनेची सभागृहातील खेळी भाजपच्या जिव्हारी; सेनेच्या आमदाराने पाठवलेल्या गुढ्या भाजपकडुन परत, अंबरनाथमध्ये महायुतीत वितुष्ट?
शिवसेनेची सभागृहातील खेळी भाजपच्या जिव्हारी; सेनेच्या आमदाराने पाठवलेल्या गुढ्या भाजपकडुन परत, अंबरनाथमध्ये महायुतीत वितुष्ट?

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Donald Trump on Nato: इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
Maharashtra Weather Alert: सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Odisha Government Hospital Fire: जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
Gas Shortage Pune: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
Iran America war unemployment: आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
Embed widget