Horoscope Today 30 March 2025: आज गुढीपाडव्याचा दिवस 'या' 5 राशींसाठी खास! कामात यश, संपत्तीत वाढ, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा..
Horoscope Today 30 March 2025: आज गुढीपाडव्याचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 30 March 2025: पंचांगानुसार, आज 30 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार रविवार. आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडव्याचा सण आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो जोडीदाराच्या उत्तम सहकार्यामुळे शांतीचा अनुभव घ्याल, व्यापारात दूरदृष्टी फायद्याची ठरेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वास टाळावा, मित्रांच्या बाबतीत विचित्र अनुभव येऊ शकतात
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज प्रकृती अस्वस्थ जाणवलं तरी, त्याकडे दुर्लक्ष कराल नोकरी धंद्यात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज महिला सहजीवनाचा आनंद लुटतील. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज तुमच्या करड्या आणि कणखर स्वभावामुळे दुसऱ्याच्या मनात आदरयुक्त भीती निर्माण करण्यात यशस्वी होणार आहात.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज कीर्ती प्रसिद्धीचे योग येतील, दूरच्या प्रवासाच्या संधी मिळतील.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज मनातील सर्वच गुप्त गोष्टी बोलून दाखवायला हव्यात असे नाही, प्रयत्नांवर विश्वास ठेवा.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज भाग्य उजळून काढण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त कराल आणि विलंब अडथळ्यांना पार करून यशाचा किनारा गाठाल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज 'असेल हरी तर देईल खटल्यावरी' हा विचार गोत्यात आणेल, व्यापारी वर्गाला पैशाची आवक अपेक्षा पेक्षा चांगली राहिल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज घरामध्ये तुमची हुकूमशाही चालणार नाही, नाहीतर तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते .
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज महिला मनाप्रमाणे वागतील, रागाचा पारा वाढू शकतो
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज थोड्या लहरी स्वभावाचा तोटा सहन करावा लागेल, कर्ज मिळण्याच्या संधी मिळतील.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा>>
Gudi Padwa 2025: गुढीपाडव्याला 'हे' शुभ योग दिवसभर असतील, मनातील इच्छा होईल पूर्ण! पूजेचा शुभ मुहूर्त, तारीख आणि तिथी जाणून घ्या...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















