फक्त 12000 रुपयांची गुंतवणूक करा, कमी काळात करोडपती व्हा, जाणून घ्या 'या' सरकारी योजनेबाबत सविस्तर माहिती
अलिकडच्या काळात गुंतवणुकीचे (investment) विविध मार्ग आहेत. कमी काळात अधिक नफा मिळवून देणाऱ्या विविध योजना आहे.
Government schemes : अलिकडच्या काळात गुंतवणुकीचे (investment) विविध मार्ग आहेत. कमी काळात अधिक नफा मिळवून देणाऱ्या विविध योजना आहे. दरम्यान, गुंतवणूक करताना दोन गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं, एक म्हणजे आपण गुंतवणूक केलेली ठेव सुरक्षीत आहे का? आणि दुसरी गोष्ट आपल्या ठेवीवर परतावा किती मिळतो? या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. दरम्यान, या दोन्ही गोष्टींची पूर्तता PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या योजनेते होते. प्रत्येक महिन्याला 12000 रुपये भरुन तुम्ही करोडपती होऊ शकता. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
पीपीएफसारख्या सरकारी योजनेत गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो
पीपीएफसारख्या सरकारी योजनेत गुंतवणूकदारांना निश्चित परतावा मिळत आहे. त्यांच्या जमा झालेल्या पैशावर बाजारातील चढ-उताराचा परिणाम होत नाही. या योजनेअंतर्गत दरमहा 3 हजार, 6 हजार आणि 12 हजार रुपये जमा करून तुम्ही 25 वर्षांत किती पैसे वाचवू शकता? यामध्ये किती व्याज मिळते? तुम्ही तुमचे पैसे कधी काढू शकता? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
3000 च्या ठेवींवर किती निधी मिळेल?
तुम्ही पीपीएफ खात्यात दरमहा 3,000 रुपये जमा केल्यास, एका वर्षात 36 हजार रुपये जमा होतील आणि त्याचप्रमाणे 25 वर्षांत 9 लाख रुपये जमा होतील. कारण सरकार PPF वर वार्षिक 7.1 टक्के व्याज देते. त्यानुसार, ठेवींवर एकूण अंदाजे व्याज 15,73,924 लाख रुपये असेल. एकूणच, 25 वर्षांत दरमहा 3,000 रुपये जमा करून तुम्ही 24,73,924 लाख रुपये वाचवाल.
6 हजार रुपयांच्या ठेवीवर किती निधी?
जर तुम्ही या योजनेत 25 वर्षे दरमहा 6 हजार रुपये जमा केले तर तुम्ही 18 लाख रुपये जमा कराल आणि त्यावर एकूण अंदाजे व्याज 31,47,847 रुपये असेल. जर एकूण जमा रक्कम आणि व्याज जोडले तर तुमची 25 वर्षांत एकूण 4947847 रुपयांची बचत होईल.
योग्य नियोजन केल्यास 1 कोटी रुपयांपर्यंतचा निधीही तयार होतो
PPF मध्ये 25 वर्षे दरमहा 6,000 रुपये जमा केल्याने तुमची सुमारे 50 लाख रुपयांची बचत होईल. त्याच वेळी, जर तुम्ही दरमहा 12 हजार रुपये जमा केले तर तुमच्याकडे सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी असेल. 12 हजार रुपये दराने, 25 वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक रक्कम 36,00,000 रुपये होईल. या कालावधीत मिळणारे अंदाजे व्याज रुपये 6295694 असेल आणि एकूण गुंतवणूक सुमारे 9895694 रुपये असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:























