आसिम रियाज आणि रजत दलालमध्ये हाणामारी, शिखर धवन भांडण सोडवायला आला अन्...पुढे काय घडलं?
Asim riaz and Rajat dalal massive fight : आसिम रियाज आणि रजत दलालमध्ये हाणामारी, शिखर धवन भांडण सोडवायला आला अन्...पुढे काय घडलं?

Asim riaz and Rajat dalal massive fight : बिग बॉस फेम कलाकार रजत दलाल आणि आसिम रियाज यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. दोघंही नेहमी भांडण करण्यासाठी उतावळे असतात. दोघेही बिग बॉसच्या वेगवेगळ्या सिझनमध्ये दिसले होते. सध्या दोघेही एकत्र पाहायला मिळाले आहेत. मात्र, दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झालेली पाहायल मिळाली आहे. त्यांच्यामध्ये सुरु असलेली हाणामारी रोखण्यासाठी भारताचा क्रिकेटर शिखर धवन मध्यस्थी करताना दिसलाय. रजत आणि आसिमच्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
अमेजन एमएक्स प्लेअर यांचं नवं बॅटलग्राऊंड येणार आहे. या शो चं प्रमोशन करण्यासाठी एका इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये आसिम आणि रजत आणि रुबीना दिलैक एकत्र आलेले पाहायला मिळाले होते. यावेळी भारताचा क्रिकेटपटू शिखर धवन देखील सामील झाला होता.
रजत दलाल आणि आसिम रियाज यांच्यातील वादामुळे रुबीना हैराण
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रजत दलाल आणि आसिम रियाज यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी सुरु झाल्यानंतर रुबीना हैराण झालेली पाहायला मिळाली. दोघांमधील भांडण इतकं वाढतं की ते आपापल्या जागेवरून उठले आणि बाचाबाची सुरू केली होती. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली आणि मध्येच बसलेली रुबिना तिथून लगेच जागेवरुन उठली आणि तिने दोघांकडे पाहिलेही नाही, फक्त ऐकत राहली.
दोघांमधील भांडण थांबवण्यासाठी शिखर धवनची मध्यस्थी
आसिम आणि रजत यांच्यातील वाद मिटवण्यासाठी क्रिकेट शिखर धवनने मध्यस्थी केलेली पाहायला मिळाली. यावेळी दोघेही एकमेकांना धमकी देताना पाहायला मिळाले. खूप गोंगाट असल्याने ते एकमेकांना काय बोलत आहेत हे समजले नाही. त्यानंतर शिखरने दोघांना वेगळे करण्यासाठी मध्यस्थी केली. शेवटी असीम खुर्चीला ढकलून खाली पाडला आणि तिथून निघून गेला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. काही लोक या व्हिडिओला प्रँक म्हणत आहेत तर काही लोक याला खरा म्हणत आहेत. नुकताच रजत दलाल यांचा दिग्विजय सिंह राठीसोबत भांडण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या






















