GT vs MI Score IPL 2025 : शुभमन गिल जोमात, हार्दिक पांड्या कोमात; मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव, गुजरातनं पॉइंट टेबलमध्ये उघडलं खातं
आज आयपीएल 2025चा नववा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला आहे.

Background
Gujarat Titans vs Mumbai Indians Scorecard Update IPL 2025 : आज आयपीएल 2025चा नववा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला आहे. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला आहे. आयपीएल 25 मध्ये गुजरातचा हा पहिला विजय आहे, तर मुंबईच्या संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात, संपूर्ण मुंबई संघ फक्त 160 धावा करू शकला. रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला, तर हार्दिक पांड्याही एका महत्त्वाच्या क्षणी आऊट झाला.
Thrilling the home crowd with a performance to cherish 🤩
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2025
Gujarat Titans get their #TATAIPL 2025 campaign off the mark 💪
Scorecard ▶ https://t.co/lDF4SwnuVR #GTvMI | @gujarat_titans pic.twitter.com/iy60R0cOwZ
तुफानी सुरुवात केल्यानंतरही गुजरात टायटन्सला 20 षटकांत 8 गडी गमावून फक्त 196 धावा करता आल्या. गुजरातने पहिला विकेट 78 धावांवर आणि दुसरा विकेट 129 धावांवर गमावला असला तरी, शेवटच्या षटकांमध्ये विकेट पडल्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गुजरातकडून साई सुदर्शनने 41चेंडूत 63 धावा, शुभमन गिलने 27 चेंडूत 38 धावा, जोस बटलरने 24 चेंडूत 39 धावा केल्या. यानंतर, शाहरुख खान 09 धावा करून बाद झाला, शर्फान रुदरफोर्ड 18 धावा करून, राहुल तेवतिया 0 धावा करून आणि रशीद खान 06 धावा करून बाद झाला. मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.
Match 9. Gujarat Titans Won by 36 Run(s) https://t.co/lDF4SwnuVR #GTvMI #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2025
मुंबई इंडियन्ससमोर 197 धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरादाखल, मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली, कारण दोन्ही सलामीवीर 35 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. तेथून सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यात भागीदारी झाली. पण मधल्या षटकांमध्ये, गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी इतका कहर केला की मुंबईने 27 धावांच्या अंतराने 4 मोठ्या विकेट गमावल्या.
एकेकाळी एमआयची फलंदाजी 2 बाद 97 धावांवर होती, पण त्यानंतर तिलक वर्मा 39 धावा करून बाद झाला. येथून विकेट पडण्याची सुरुवात अशा प्रकारे झाली की मुंबईने 27 धावांच्या आत 4 विकेट गमावल्या. गुजरातकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. कागिसो रबाडा आणि साई किशोर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
GT vs MI IPL 2025 : शुभमन गिल जोमात, हार्दिक पांड्या कोमात; मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव, गुजरातनं पॉइंट टेबलमध्ये उघडलं खातं
साई सुदर्शनच्या फलंदाजीच्या चमकदार कामगिरी आणि त्यानंतर गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव करून विजयाचे खाते उघडले. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव झाला आहे.
मुंबई इंडियन्स संकटात! इम्पॅक्ट प्लेयर रॉबिन मिंज परतला पॅव्हेलियनमध्ये
इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेला रॉबिन मिंज गुजरातविरुद्ध काही खास कामगिरी करू शकला नाही आणि चौथा फलंदाज म्हणून बाद झाला.




















