एक्स्प्लोर

Beed: लग्नसमारंभाहून येताना माजलगाव महामार्गावर भरधाव वाहनाने उडवलं, शरद पवार गटाचे प्रदेश सचिवांचा मृत्यू

माजलगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर उभे असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत काळे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Beed: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सचिव श्रीहरी काळे (Shrihari Kale) यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. माजलगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर उभे असताना एका भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. श्रीहरी काळे हे मित्रांसह लग्न समारंभाहून परतत होते. माजलगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर ते काही क्षणांसाठी थांबले असताना एका वेगवान वाहनाने त्यांना धडक दिली. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा

अज्ञात वाहनाच्या धडकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सचिव श्रीहरी काळे यांचे अपघाती निधन झाले आहे. माजलगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर उभे असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत काळे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. श्रीहरी काळे आपल्या मित्रांसह लग्न समारंभ आटोपून घरी येत असताना ही घटना घडली आहे. श्रीहरी काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार गटात कार्यरत आहे. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. तर अज्ञात वाहनधारका विरोधात गुन्हा नोंदवून पोलीस अधिक तपास करत आहेत. श्रीहरी काळे यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि परिचितांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. 

अंबरनाथच्या हत्याकांडाचा नवा अँगल समोर

अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रीजवर झालेली महिलेची हत्येबाबत नवी माहिती समोर आली आहे. ही हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचं समोर आलं आहे. मयत महिलेने आरोपीला उसने पैसे दिले होते. ते पैसे परत कर नाहीतर लग्न कर असा तगादा लावल्यानंतर आरोपीने महिलेची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयत सीमा कांबळे आणि आरोपी राहुल भिंगारकर यांचे प्रेमसंबंध होते.  सीमा कांबळे ही 35 वर्षांची होती तर राहुल भिंगारकर हा 29 वर्षांचा आहे. सीमाने राहुल भिंगारकरला हात उसने पैसे दिल्याची माहिती समोर आली असून त्यानंतर सीमाने पैशासाठी तगादा लावला होता. हात उसने दिलेले पैसे दे नाहीतर लग्न कर असा तगादा सीमा कांबळने आरोपी राहुल भिंगारकर मागे लावल्याची प्राथमिक माहिती आहे. (Ambernath Woman Murder)

हेही वाचा:

Ambernath : 35 वर्षीय सीमा, 29 वर्षीय राहुल, प्रेमप्रकरण, पैसा आणि लग्नाचा तगादा, अंबरनाथच्या हत्याकांडाचा नवा अँगल समोर!

 

महत्त्वाच्या बातम्या

उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
Beed Vaidyanatha Temple: राष्ट्रीय सुरक्षा पथक बीडमधील वैजनाथाच्या मंदिरात धडकलं, सुरक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
राष्ट्रीय सुरक्षा पथक बीडमधील वैजनाथाच्या मंदिरात धडकलं, सुरक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget