एक्स्प्लोर

Maharashtra Weather : सावधान! एप्रिलच्या सुरवातीलाच गारपिटीसह अवकाळीचे संकट; शेतकऱ्यांनी घ्यावी विशेष खबरदारी, राज्यात हवामानाचा अंदाज काय? 

Maharashtra Weather Update: राज्यात 1 एप्रिल ते 7 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची (Maharashtra Weather) शक्यता असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी वर्तवला आहे.

Maharashtra Weather Update : राज्यामध्ये आता सर्व शेतकऱ्यांचा कांदा काढणं चालू आहे. त्याच्यानंतर गहू, हरभरा, ज्वारी काढणं चालू होईल. दरम्यान सर्व शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत आलेली पिके काढून घ्यावी. द्राक्ष बागायतदारांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. कारण राज्यात 1 एप्रिल ते 7 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची (Maharashtra Weather) शक्यता असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao dakh) यांनी वर्तवला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. यात मुंबई आणि पुणेला देखील पाऊस पडणार असल्याचा अंदाज ही पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. 

पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश, मराठवाडा या सर्व भागामध्ये दररोज एक-एक, दोन-दोन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे. तसेच कोकणपट्टी मध्ये जास्त पाऊस पडणार आहे आणि गारपिटीची देखील शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याचे ही डख यांनी सांगितलंय.

द्राक्ष बागायतदारांसह शेतकऱ्यांनी घ्यावी विशेष काळजी  

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे, तर कुठं उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. अशातच राज्यात उष्णतेच्या पारा दिवसागणिक वाढत असताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळीचे ढग अजून गडद होण्याची शक्यता आहे. परिणामी ज्या शेतकऱ्याला द्राक्ष रॅकवर टाकायचा असेल तर ते 5 एप्रिलनंतर टाकण्याचा सल्ला देखील हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे. कारण द्राक्ष पट्ट्यात खूप पाऊस पडणार आहे. ज्या शेतकऱ्याच्या टरबूज, खरबूज असेल त्यांनी ही काळजी घ्यावी. सुरतपासून कोल्हापूरपर्यंत या पट्ट्यात जास्त पाऊस पडणार असल्याचे ही ते म्हणाले.  

मुंबई पुण्यातही पाऊसची शक्यता 

अंदाजानुसार सगळ्यात जास्त पाऊस  कोकणात असणार आहे. कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. सात दिवस दररोज आज या भागात तर उद्या दुसऱ्या भागात पुन्हा परवा दिवशी तिसऱ्या भागात पुन्हा चौथ्या दिवशी पहिल्या भागात असा अवकाळी पाऊस पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर मुंबई आणि पुणेला देखील पाऊस पडणार आहे. 

नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन

दरम्यान भंडाऱ्यात आगामी दिवसात यावर्षीच्या सर्वाधिक 41 अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. भंडारा जिल्ह्यात आज दिवसभर आकाश नीरभ्र राहणार असून तापमानात वाढ होणार असल्यानं नागरिकांनी महत्वाचं काम असल्यासचं घराबाहेर पडावं, असं आवाहन नागरिकांना केलं आहे.

उष्माघातपासून बचाव करण्यासाठी या कराव्यात उपाययोजना

🔸महत्वाचे नसल्यास शक्यतो दुपारी १२ ते ४ दरम्यान उन्हात निघणे टाळावे.
🔸उन्हात निघत असताना डोके, कान, नाक कापडानं झाकूनचं बाहेर निघावं.
🔸चहा, कॉफ़ी व कॅफीनयुक्त शितपेय घेणे टाळावं.
🔸मुबलक प्रमाणात पाणी प्यावं.
🔸तब्येत अस्वस्थ वाटल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.
🔸जनवारांना सावलीत ठेवावं व वेळोवेळी पाणी द्यावं.
🔸उष्माघातग्रस्त व्यक्ती आढळल्यास तात्काळ 108 वर संपर्क करावं.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!
मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
AI Impact Summit 2026: जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?

व्हिडीओ

Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस
Sanjay Raut on Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शिवसेनेत यावं, संजय राऊतांची खुली ऑफर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!
मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
AI Impact Summit 2026: जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
नांदेडमधील माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी नेत्याचं एकनाथ शिंदेंकडून कौतुक, म्हणाले...
नांदेडमधील माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी नेत्याचं एकनाथ शिंदेंकडून कौतुक, म्हणाले...
Harshvardhan Sapkal: अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
Pune BJP Congress Rada: जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
Embed widget