एक्स्प्लोर
Godavari Flood 2024 : गोदावरीत पुराच्या पाण्यात अडकली कार, अग्निशमन विभागाची धावपळ, पाहा PHOTOS
Nashik Rain Update : गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे दहा धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. गंगापूर धरणातून पुन्हा एकदा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

Godavari Flood 2024
1/7

जिल्ह्यात पाऊस सुरु असल्याने गोदावरी नदीला तीन दिवसांपासून पूर आलेला आहे.
2/7

गोदावरीच्या पुराच्या पाण्यात गाडगे महाराज पुलाखाली कार अडकल्याची घटना घडली.
3/7

गाडगे महाराज पुलाखाळून एक कार वाहून जाताना अग्निशमन दलाने रेस्क्यू ऑपरेशनने कार बाहेर काढली.
4/7

पंचवटीच्या गाडगे महाराज पुलाखाली सलग तिसऱ्या दिवशी देखील पुराचे पाणी असल्याने याठिकाणी येण्या -जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे.
5/7

वाहनधारक पुराच्या पाण्यातून वाहन काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यातच एक कार या पुराच्या पाण्यात पुलाखाली अडकली असल्याची घटना घडली.
6/7

काल रात्री 11 ते 12 वाजेच्या दरम्यान पंचवटीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने ही कार पुराच्या पाण्यातून बाहेर काढली.
7/7

सध्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात 3 हजार 392 क्युसेसने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Published at : 08 Sep 2024 10:34 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion