Maharashtra News LIVE Updates : भाजपचं ठरलं, सेना राष्ट्रवादी विधानपरिषदेवर कुणाला संधी देणार?
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. भाजपनं विधानपरिषदेसाठी तीन नेत्यांची नावं निश्चित केली आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अन् एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं अजून नाव ठरलेलं नाही. त्यामुळं आज कुणाला संधी मिळणार,कोण नाराज होणार ते पाहावं लागेल. यासह इतर घडामोडी एका क्लिकवर ....
धक्कादायक! पाठलाग करणाऱ्या पतीचा मंगळसूत्र चोरट्यांनी दगडाने ठेचला चेहरा; अकोल्यातील घटना
Akola Crime : अकोल्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर येतीये.. पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला मंगळसूत्र चोरट्यांनी बेदम मारहाण करीत पूर्ण चेहरा दगडाने ठेचून काढलाय.. अकोल्यातल्या रेल्वे स्थानकाजवळील ही घटना आहे.. अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर मंगळसूत्र चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळ काढला होता... त्यानंतर महिलेचा पती हेमंत गावंडे यांनी मंगळसूत्र चोरट्यांचा पाठलाग केला. याच दरम्यान चोरट्यांनी गावंडे यांना बेदम मारहाण केली, इतकेच नाही तर त्यांचा चेहरा देखील दगड ठेचून काढलाय.. काल रात्री उशिरा अकोला रेल्वेस्थानक परिसरात ही घटना घडली..
सद्यस्थितीत हेमंत गावंडे यांचे प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर भेट देत पाहणी केली.. तसेच मंगळसूत्र चोरट्याच्या शोधार्थ पथक गठीत कले असून रवाना केले. दरम्यान या घटनेने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित होतोय? रेल्वे स्थानक परिसरात एवढी मोठी घटना घडते, त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण होतो आहे.
विधिमंडळाच्या विशेष समित्यांची आज घोषणा होणार;हक्कभंग समितीवर कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष
विधिमंडळाच्या विशेष समित्यांची आज घोषणा होणार
हक्कभंग समितीवर कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष
मंत्रीपदाला हुलकावणी दिलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची या विशेष समित्यावर वर्णी लागणार
























