एक्स्प्लोर

Beed Crime: मुलीला विकाससोबत शेतात नको त्या अवस्थेत पाहिलं अन् वडील संतापले; बीडमधील ट्रकचालक तरुणाच्या हत्याप्रकरणाचं खरं कारण समोर

Beed Crime news: विकासचे मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, संतापलेल्या क्षीरसागर कुटुंबीयांनी जीव जाईपर्यंत मारलं, बीडमधील धक्कादायक घटना. दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

बीड: बीड जिल्ह्यात विकास बनसोडे या ट्रकचालक तरुणाची हत्या झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या तरुणाला त्याच्या पूर्वीच्या मालकाने दोन दिवस पत्र्याच्या शेडमध्ये डांबून बेदम मारहाण केली होती. यामध्ये विकासचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला सुरुवात केली होती. त्यावेळी या हत्येमागील (Beed Murder) खरे कारण समोर आले आहे.  विकास अण्णा बनसोडे (वय 23) याचे ट्रकचा मालक असणाऱ्या भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरुन भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकासला कामावरुन काढूनही टाकले होते.

विकास बनसोडे हा आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील रहिवासी होता. गेल्या आठवड्यात विकास कड परिसरात आला होता. त्याचे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. हे दोघेजण भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरामागे असलेल्या शेतात आक्षेपार्ह अवस्थेत दिसल्यानंतर मुलीचे वडील संतापले होते. त्यांनी नातेवाईकांसह विकास बनसोडे याला दोन दिवस एका पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवले. याठिकाणी दोरी आणि वायरच्या साहाय्याने विकास बनसोडे याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे विकासचे संपूर्ण शरीर काळेनिळे पडले होते. या अमानुष मारहाणीत विकासचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर आरोपींनी त्याचा मृतदेह कड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन ठेवला आणि तिथून पळ काढला. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच विकास बनसोडे याची निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली होती.

बीड पोलिसांनी याप्रकरणात एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  यापैकी भाऊसाहेब क्षीरसागर, स्वाती क्षीरसागर, सुवर्णा क्षीरसागर या तिघांना पोलिसांनी अटक केली. इतर आरोपींमध्ये समावेश असलेले बाबासाहेब क्षीरसागर, संकेत क्षीरसागर, संभाजी झांबरे, सचिन भवर, सुशांत शिंदे आणि बापूराव शिंदे हे अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून या सगळ्यांचा कसून शोध घेतला जात आहे. या प्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत देखील गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हानपुडे पाटील करत आहेत.

हत्येनंतर आरोपींचा विकासच्या कुटुंबीयांना फोन

विकासला पत्र्याच्या शेडमध्ये डांबून मारहाण करत असताना आरोपींनी विकासच्या फोनवरुनच त्याच्या आई-वडिलांना फोन केला होता. त्यावेळी भाऊसाहेब क्षीरसागरने विकासच्या आईवडिलांना तातडीने आमच्या घरी निघून या, असे सांगितले. त्यांच्या फोनवरील संभाषणाची क्लीप समोर आल्याचे समजते. त्यावेळी विकासच्या आई-वडिलांनी आमच्या मुलाला आणखी मारु नका, अशी विनवणी केली. मात्र, तोपर्यंत विकासचा मृत्यू झाला होता. 

आणखी वाचा

बीडमध्ये अंगावर काटा आणणारी घटना, प्रेमसंबंधाच्या संशयावरुन मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाला जीव जाईपर्यंत मारलं, अंगावर काळे-निळे वळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा, वाहतुकीस अडथळा आणणारी दुकानेही बंद करा, आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश
अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा, वाहतुकीस अडथळा आणणारी दुकानेही बंद करा, आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश
माढ्यात दोन गटात जोरदार हाणामारी, भाजप जिल्हा परिषद सदस्याच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल 
माढ्यात दोन गटात जोरदार हाणामारी, भाजप जिल्हा परिषद सदस्याच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल 
वसईत नवजात बालिकेला सोडलं रस्त्यावर, आंतरराष्ट्रीय महिला दिनीच धक्कादायक घटना, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
वसईत नवजात बालिकेला सोडलं रस्त्यावर, आंतरराष्ट्रीय महिला दिनीच धक्कादायक घटना, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
Crime News: नातवाचा आजीवर अत्याचार, शरीराचे चावे घेऊन संपवलं, हादरवून टाकणारी घटना
नातवाचा आजीवर अत्याचार, शरीराचे चावे घेऊन संपवलं, हादरवून टाकणारी घटना

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget