एक्स्प्लोर

Chhaava Box Office Collection Day 31: 'छावा'ची जबरदस्त कमाई; बॉलिवूडच्या टॉप-2 फिल्म्समध्ये सामील होण्याची तयारी, आतापर्यंतच्या कमाईचा आकडा ऐकला?

Chhaava Box Office Collection Day 31: विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटानं आज पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. चित्रपटानं आतापर्यंत किती कमाई केली?

Chhaava Box Office Collection Day 31: विक्की कौशल (Vicky Kaushal) - रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'छावा' (Chhaava Movie) हा चित्रपटानं थिएटरमध्ये शानदार पाच आठवडे पूर्ण केले आहेत. गेल्या 30 दिवसांपासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) राज्य करत आहे. अशातच आता सलमान खानचा (Salman Khan) सिकंदर (Sikandar Movie) प्रदर्शित होईपर्यंत तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत राहिल, असंच चित्र सध्या पाहायला मिळतंय. गेल्या 30 दिवसांत अनेक चित्रपट आले, अनेक गेले, पण 'छावा'च्या साम्राज्याला साधा कुणी स्पर्शही करू शकलेलं नाही. 

चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आज 31 वा दिवस आहे आणि आजच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडेदेखील समोर आले आहेत. जाणून घेऊया, चित्रपटानं आतापर्यंत किती कमाई केली, त्याबाबत सविस्तर... 

View this post on Instagram
 
A post shared by Maddock Films (@maddockfilms)

'छावा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती? 

अधिकृत आकडेवारीनुसार, 4 आठवड्यात, 'छावा'नं हिंदीमध्ये 540.38 कोटी आणि तेलुगूमध्ये 11.80 कोटी कमावले आहेत, ज्यामुळे एकूण 552.18 कोटी कमावले आहेत.

सॅकनिल्कच्या मते, चित्रपटानं 29 व्या आणि 30 व्या दिवशी हिंदी आणि तेलुगूमध्ये अनुक्रमे 7.5 कोटी आणि 7.9 कोटींची कमाई केली. म्हणजेच, एका महिन्यात चित्रपटाची एकूण कमाई 567.58 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. आता, 'छावा'नं आज सकाळी 10:25 वाजेपर्यंत 8 कोटी रुपये कमावून 575.58 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दरम्यान, समोर आलेले हे आकडे कन्फर्म नाहीत, यामध्ये बदल होऊ शकतात. 

'छावा' टॉप 3 वरून टॉप 2 मध्ये दाखल 

'छावा'नं सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 3 हिंदी चित्रपटांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे. या चित्रपटानं 'अ‍ॅनिमल'चा देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शनचा रेकॉर्ड (553.87 कोटी) मोडून हे स्थान मिळवलं आहे.

सध्या, शाहरुख खानचा जवान (640.25 कोटी) यादीत अव्वल स्थानावर आहे आणि स्त्री 2 (597.99 कोटी) दुसऱ्या स्थानावर आहे. 'छावा'कडे अजून दोन आठवडे आहेत. चित्रपटाचा वेग पाहून असं दिसतंय की, हा चित्रपट लवकरच स्त्री 2 चा रेकॉर्ड मोडू शकतो. सध्या हा चित्रपट श्रद्धा कपूर-राजकुमार राव यांच्या चित्रपटापेक्षा सुमारे 25 कोटी रुपये मागे आहे.

दरम्यान, 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेली फिल्म 'छावा' छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका विक्की कौशलनं साकारली आहे. तर, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना झळकली आहे. तसेच, मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्नानं साकारली आहे. याव्यतिरिक्त विनीत कुमार सिंह, आशुतोष राणा, दिव्या दत्तासह अनेक सेलिब्रिटी 'छावा'मध्ये झळकले आहेत. तर, चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Box Office Collection Day 30: 'छावा' धुवांधार, बॉक्स ऑफिसवर पैशांची बरसात; किंग खानच्या 'पठान'चा रेकॉर्ड चक्काचूर करण्यासाठी विक्की कौशल सज्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवानSpecial Report | Pakistan Vs Baloch Liberation Army | पाकचे तुकडे होणार? स्वतंत्र बलुचिस्तान निर्मितीची नांदी?Special Report Politics On Aurangzeb Kabar : औरंगजेबाची कबर, राजकारण जबर; वाद मिटणार की चिघळणार?Special Report | Sanjay Raut | 'हिंदू पाकिस्तान', राजकीय घमासान; इतिहासाचे दाखले, वर्तमानावर आसूड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
Embed widget