एक्स्प्लोर
Building Collapse : अन् क्षणार्धात तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, PHOTOS पाहून काळजाचा ठोका चुकेल
Building Collapse : धुळे जिल्ह्याच्या शिरपूर शहरातील जैन गल्लीत जीर्ण झालेली तीन मजली इमारत अचानक पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आहे.
Building Collapse
1/8

या इमारतीत राहणारे कुटुंब एक दिवस आधीच स्थलांतरित झाले होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
2/8

भरत केशवलाल जैन यांच्या मालकीची ही वडिलोपार्जित इमारत होती.
3/8

इमारतीला लागून जैन समाज मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू होते. या बांधकामासाठी जुने घर पाडण्यात आले होते.
4/8

त्यामुळे इमारतीचा एका बाजूचा आधार नसल्यामुळेच इमारत कोसळल्याचे सांगितले जात आहे.
5/8

इमारत कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
6/8

या घटनेमुळे कोसळलेल्या इमारतीला लागून असलेल्या दुसऱ्या तीन मजली इमारतीला धोका निर्माण झाला आहे.
7/8

स्थानिक प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.
8/8

इमारत कोसळण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे.
Published at : 16 Mar 2025 11:35 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























