एक्स्प्लोर
राजेश खन्नाची नात अन् अमिताभ यांचा नातू दिसणार एकत्र, नव्या चित्रपटात ऑनस्क्रीन रोमान्स करणार!
राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांची पुढची पिढी आता बॉलिवुडमध्ये दिसणार आहे. नओमिका सरन आणि अगस्त्य नंदा एका चित्रपटात एकत्र दिसणार आहे.

naomika saran and agastya nanda
1/9

दिग्गज अभिनेता राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी कधीकाळी बॉलिवुड चांललंच गाजवलं. या दोघांचा आनंद नावाचा एक चित्रपटही आला होता. दरम्यान आता याच अभिनेत्यांची पुढची पिढी बॉलिवुडमध्ये दिसणार आहे.
2/9

मिळालेल्या माहितीनुसार राजेश खन्ना यांची नात नओमिका सरन आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांचा एक चित्रपट येणार आहे. या चित्रपटात रोमान्स आणि कॉमेडी पाहायला मिळणार आहे.
3/9

नओमिका सरन ही राजेश खन्ना यांची मुलगी रिंकी खन्ना यांची मुलगी आहे. तर अगस्त्य नंदा हा अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा यांचा मुलगा आहे. हे दोघेही आता नव्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
4/9

नओमिका सरन ही अगोदरासूनच सोशल मीडियावर चर्चेत असते. तर अगस्त्य नंदाचा याआधी 'द आर्चीज' हा चित्रपट आलेला आहे. मॅडॉक फिल्म्सतर्फे या चित्रपटाची निर्मिती केली जाईल. तर किस्मत, किस्मत 2, शड्डा आदी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे जगदीप सिद्धू या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील.
5/9

नओमिकाचा हा पहिलाच चित्रपट असेल. नओमिकाची आई रिंकी खन्ना ही अभिनेत्री आहे. गोविंदाच्या 'जिस देश मे गंगा रहता है' या चित्रपटात तिने भूमिका साकारलेली आहे. मात्र रिंकी खन्नाला सिनेसृष्टीत फारसे यश मिळालेले नाही.
6/9

सिनेसृष्टीत जम बसत नसल्याचे समजताच रिंकीने लग्न करून विदेशात संसार थाटला. दुसरीकडे अगस्त्य नंदाचा दर्चीज हा चित्रपट आलेला आहे. त्यानंतर आता लवकरच लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या जीवनावर आधारलेल्या इक्कीस या चित्रपटातही तो दिसणार आहे.
7/9

नओमिका सरन तिच्या मैत्रिणींसोबत
8/9

नओमिका सरन तिच्या मैत्रिणीसोबत
9/9

नओमिका सरन आणि तिची मैत्रीण
Published at : 08 Feb 2025 08:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion