Jalgaon Crime : शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाला चॉपरनं सपासप वार करत संपवलं; जळगावात खळबळ
Jalgaon Crime : जळगावजवळील कानसवाडा गावाच्या माजी उपसरपंचाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. यामुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जळगावजवळील कानसवाडा गावाच्या माजी उपसरपंचाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. चॉपर आणि चाकूने वार करत उपसरपंचाची हत्या झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. युवराज सोपान कोळी (Yuvraj Koli) असे मयत उपसरपंचाचे नाव आहे. या घटनेमुळे जळगावात (Jalgaon News) एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जवळील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घृण खून झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खडबड उडाली आहे. युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
चाकू आणि चॉपरने वार करत हत्या
गावातीलच तिघांनी आज (दि. 21) सकाळी आठ वाजेच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढविला. चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार चढवल्याने ते जागीच कोसळले. जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह आणण्यात आला असून नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला आहे. कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण असून खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
पिंप्राळा हुडको भागात दोन गटात हाणामारी
दरम्यान, जळगावातील पिंप्राळा हुडको भागामध्ये किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पिंप्राळा हुडको भागातील दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला. पहिल्या गटातील पूजा शशिकांत सावळे (35) यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की, संशयित आरोपी राहुल निकम, अनिता निकम, सोनाबाई रणशिंगे, ज्योती निकाळजे, गणेश निकाळजे, निखिल निकाळजे, विशाल निकाळजे, मुकेश निकाळजे आणि हिराबाई निकाळजे या नऊ जणांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना रस्त्यावर दगड, विटा फेकून मारहाण केली. यातील विशाल निकाळजे याने धारदार चाकूचा वापर करून पूजा सावळे यांच्या चेहऱ्यावर हल्ला केला आणि गंभीर जखमी केले. दुसऱ्या गटातील निखिल गणेश निकाळजे (19) यांनीही फिर्यादीत नमूद केले आहे की, संशयित आरोपी किशोर लक्ष्मण सपकाळे, रोहित सपकाळे, दीपक सपकाळे, मिलिंद चित्ते आणि विकी सपकाळे यांनी त्यांना आणि त्यांच्या भावाला लाकडी दांडक्यांनी आणि कोयत्यांनी वार करून गंभीर दुखापत केली. या घटनेबाबत रामानंद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

