एक्स्प्लोर
इकडे युझवेंद्र-धनश्रीचा घटस्फोट, पण त्यापूर्वीच आरजे माहवशने अपलोड केले खास डझनभर फोटो, रेड हर्टच्या इमोजीने वेधलं लक्ष!
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. या घटस्फोटाच्या आधी आरजे माहवशने काही फोटो अपलोड केले आहेत. या फोटोंची सध्या सगळीकडेच चर्चा चालू आहे.

RJ MAHVASH AND YUZVENDRA CHAHAL AND DHANASHREE VERMA
1/13

क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर, डान्सर धनश्री वर्माच्या यांच्या घटस्फोटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती.
2/13

अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज अधिकृतपणे मंजूर केला आहे. त्यानंतर आता धनश्री आणि युझवेंद्र हे एकमेकांचे पत्नी-पती राहिलेले नाहीत.
3/13

या दोघांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्यापासून आरजे माहवशचे नाव युझवेंद्र चहलशी जोडले जात आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी ते दोघे एकत्र दिसले आहेत.
4/13

नुकतेच भारत आणि न्युझीलंडच्या सामन्यात युझवेंद्र चहल आणि आरजे माहवश हे एकमेकांच्या बाजूला बसले होते. त्यांचे काही फोटो व्हायरल झाले होते.
5/13

विशेष म्हणजे ते एकमेकांच्या बाजूला बसून हसत-हसत गप्पा मारत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते. याच व्हिडीओनंतर हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा रंगली.
6/13

हे दोघेही सध्या रिलेशनशीपमध्ये आहेत, असे म्हटले जात असले तरी याबाबत सध्यातरी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. युझवेंद्र किंवा आरजे माहवश हिनेदेखील याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.
7/13

धनश्री आणि युझवेंद्र यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताच्या काही तास अगोदर आरजे माहवशने डझनभर फोटो अपलोड केले आहेत.
8/13

या फोटोमध्ये ती पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेले दिसत आहे. सोबतच या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर लाल रंगाचा हार्ड दिसत आहे.
9/13

हे फोटो अपलोड करताना तिने लाल रंगाच्याच इमोजिचा उपयोग केला आहे. संपूर्ण शहाराला मी लाल रंगाने रंगवत आहे, अशा आशयाचं वाक्य तिने कॅप्शनमध्ये दिलंय.
10/13

तिच्या याच फोटोंची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. अवघ्या काही तासांत तिच्या या फोटोंना साडे तीन लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी युझवेंद्र चहलचे नाव घेत तिच्या या फोटोंवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.
11/13

आरजे माहवशने अपलोड केलेला फोटो
12/13

आरजे माहवशने अपलोड केलेला फोटो
13/13

आरजे माहवशने अपलोड केलेला फोटो
Published at : 20 Mar 2025 04:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion