रात्री झोपण्याआधी मोबाईल चार्जिंगला लावता? तर आजच सोडा ही सवय; तज्ज्ञांनी सांगितले दुष्परिणाम
Overnight Mobile Chraging: आपल्यातील अनेकजण रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवण्याची चूक करतात. असं करणं किती घातक ठरू शकतं हे तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
Overnight Phone Charging: आजच्या काळात मोबाईल (Mobile) फोन ही एक मूलभूत गरज बनली आहे. आपण जिथे जाऊ तिथे फोन आपल्यासोबतच ठेवतो. काही लोक तर नेहमी फोनचा चार्जर (Charger) किंवा पॉवरबँक (Powerbank) स्वत:सोबत ठेवतात. आपण कसेही राहिलो तरी चालेल, पण फोनला फुल चार्जिंग असावी, असं सगळ्यांना वाटतं. बरेच जण दिवसभर कामात व्यस्त असतात आणि त्यामुळे रात्री झोपायच्या वेळी फोनला चार्जिंग करण्याची सवय त्यांना असते. पण ही सवय फार घातक ठरू शकते, तज्ज्ञांनीही याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
बरेच जण दिवसभर फोनवर काम करतात आणि रात्री झोपताना त्यांना फोनची तितकी गरज भासत नाही, म्हणून ते फोन चार्जिंगला लावून झोपून जातात. पण असं करणं अगदी चुकीचं आहे आणि आपल्यातले बरेच जण ही चूक करतात.
रात्रभर फोन चार्जिंगला का लावू नये?
नवीन जनरेशनचे स्मार्टफोन हे चार्ज होण्यासाठी जास्तीत जास्त 2 किंवा अडीच तास घेतात. पण जेव्हा तुम्ही रात्री झोपताना फोन चार्जिंगला लावतात, त्यावेळी फोनला 7 ते 8 तास वीज मिळत असते, जे फोनच्या बॅटरी हेल्थसाठीही फार धोकादायक आहे. ऑस्ट्रेलियाच्या CQUniversity मधील इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजीचे प्रोफेसर रितेश चुघ यांनी म्हटलं की, रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेऊ नये, यामुळे फोनच्या बॅटरीची हेल्थ खराब होते आणि फोनची बॅटरी लवकर बिघडते.
फोन चार्जिंगला लावून झोपणं टाळावं
बरेच जण या गोष्टीची तक्रार करतात की, त्यांच्या फोनची बॅटरी लवकर उतरते. ही समस्या फोन जास्त वेळ चार्ज केल्यामुळे उद्भवते. रात्रभर फोन चार्ज करत ठेवणं हे देखील यामागील कारण आहे. आजचे स्मार्टफोन हे लिथियम-आयन बॅटरीसह येतात, ज्यामुळे फोनला पॉवर मिळते. परंतु, ओव्हर चार्जिंगचा बॅटरीच्या आरोग्यावर परिणाम होतो. बऱ्याच कारण्यांमुळे फोनची बॅटरी खराब होते. यातील मुख्य कारण म्हणजे, फोनच्या तापमानातील चढ-उतार, चार्जिंगची वेळ, किती वेळ फोन चार्ज केला आहे हा मुद्दा देखील. तसेच चार्जर रात्रभर गरम झाल्याने देखील फोनला धोका निर्माण होऊ शकतो.
मोबाईल ओव्हरचार्ज करू नका
जेव्हा मोबाईल रात्रभर चार्जिंगवर ठेवला जातो तेव्हा याचा अर्थ असा होतो की, मोबाईलला आवश्यकतेपेक्षा 4 पट अधिक बूस्ट मिळत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असं करणं योग्य नाही. जर तुम्हाला मोबाईलच्या बॅटरीचं आयुष्य वाढवायचं असेल तर फोनची बॅटरी 20 ते 80% च्या दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जास्त चार्जिंग करणं टाळा. कधी-कधी ओव्हरचार्जिंगमुळे आणि हिटमुळे फोनचा स्फोट होण्याचीही समस्या उद्भवते.
हेही वाचा:
Facts: कोण आहे जगातील सर्वात स्मार्ट सीईओ? जाणून घ्या कसं केलं जातं कॅल्क्युलेशन