एक्स्प्लोर

IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?

IND vs ENG 4th T20I : जीबीएस ही एक दुर्मीळ परंतु उपचार करण्यायोग्य न्यूरोलॉजिकल स्थिती आहे, ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मज्जातंतूंवर हल्ला होतो.

IND vs ENG 4th T20I : पुण्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 इंटरनॅशनल मॅचवर जीबीएसचे सावट आहे. या मॅचला परदेशातूनही हजारो प्रेक्षक येणार आहेत. त्यामुळे जीबीएसचा प्रादुर्भाव वाढणार नाही, या अनुषंगाने राज्य सरकारने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर उपाययोजना राबवत आहे. 

एमसीएचे जॉईंट सेक्रेटरी संतोष बोबडे काय म्हणाले? 

एमसीएचे जॉईंट सेक्रेटरी संतोष बोबडे यांनी सांगितले की, पिण्याचं पाणी तीनवेळा फिल्टर करुन घेतलं जाणार आहे. लॉनसाठी आणि वापरासाठी सुद्धा शुद्ध पाणी वापरलं जाणार आहे. जेणेकरून प्रेक्षकांना जीबीएसचा धोका उद्भवणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, पुणे शहरात जीबीएस बाधितांची संख्या वाढतच असल्याने रुग्णसंख्या शंभरीच्या पार गेली आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात दाखल झाले. मात्र, नांदेड भागातपाण्याची तपासणी न करताच पथक परत गेल्याने नागरिकांनी घेराव घालत आक्रोश केला. या आजाराचा आणि पाणीप्रदूषणाचा संबंध असल्याचे बोलले जात आहे. नांदेडकरांनी आरोग्य पथकाकडे विहिरीच्या पाण्याची तपासणी करण्याची मागणी केली. मात्र, कोणतीही तपासणी न करता पथक निघून गेल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत घेराव घातला. 

जीबीएस म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती?

जीबीएस ही एक दुर्मीळ परंतु उपचार करण्यायोग्य न्यूरोलॉजिकल स्थिती आहे, ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मज्जातंतूंवर हल्ला होतो. ज्यामुळे मान, चेहरा आणि डोळ्यांमध्ये अशक्तपणा येणे, मुंग्या येणे किंवा सुन्न होणे, गंभीर प्रकरणांमध्ये चालायला त्रास होणे, अन्न पदार्थ गिळता न येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणे प्रामुख्याने जीबीएसमध्ये दिसतात.

तिसऱ्या टी-20 मध्ये इंग्लंडचा विजय 

दुसरीकडे, भारतीय क्रिकेट संघ मंगळवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 26 धावांनी पराभूत झाला. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडकडून 172 धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु भारतीय फलंदाज 20 षटकात 9 विकेट गमावत 145 धावाच करू शकले. भारताने 8 षटकांत 68 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. येथून धावगती अत्यंत संथ झाली, पुढील 6 षटकांत संघाला केवळ 22 धावा करता आल्या, जे पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरले. हार्दिक पांड्याने 35 चेंडूत 40 धावा, वॉशिंग्टन सुंदरने 15 चेंडूत 6 धावा आणि अक्षर पटेलने 16 चेंडूत 15 धावा केल्या. इंग्लिश सलामीवीर बेन डकेटने (51 धावा) अर्धशतक केले. तिसरी टी-20 जिंकून इंग्लंडने मालिका वाचवली आहे. भारत अजूनही 2-1 ने पुढे आहे. चौथा सामना 31 जानेवारीला पुण्यात होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पिंपरी चिंचवडमधील 52 कोटींचं भ्रष्टाचार प्रकरण! शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादीचे खळबळजनक आरोप
पिंपरी चिंचवडमधील 52 कोटींचं भ्रष्टाचार प्रकरण! शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादीचे खळबळजनक आरोप
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
पार्थ पवारांच्या विनंतीनंतर अर्ज माघारी घेणार होते, पण धनंजय मुंडेंची पोस्ट बघून लढण्याचा निर्णय घेतला : करुणा शर्मा
पार्थ पवारांच्या विनंतीनंतर अर्ज माघारी घेणार होते, पण धनंजय मुंडेंची पोस्ट बघून लढण्याचा निर्णय घेतला : करुणा शर्मा
Pune Crime News: प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने सहा वर्षाच्या मुलाला संपवलं, प्रियकराच्या साथीने बनावही रचला, पण आजोबांमुळे फुटलं प्रकरणाचं बिंग, नेमकं काय घडलं?
प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने सहा वर्षाच्या मुलाला संपवलं, प्रियकराच्या साथीने बनावही रचला, पण आजोबांमुळे फुटलं प्रकरणाचं बिंग, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
Sharad Pawar on Varkari: वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
BMC Budget 2026-27: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून नव्या वादाची शक्यता
एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपावरून नव्या वादाची शक्यता
Embed widget