(Source: Poll of Polls)
Facts: कोण आहे जगातील सर्वात स्मार्ट सीईओ? जाणून घ्या कसं केलं जातं कॅल्क्युलेशन
Smartest CEO in the World: जगातील प्रत्येकजण आपापल्या परीने हुशार आहे. त्यात कंपनीत काम करायचं असेल तर हुशार तर असावं लागतंच. पण तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात हुशार सीईओ कोण आहे?
Smartest CEO: कोणत्याही कंपनीला सर्वोच्च स्थानी नेण्यात त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांपेक्षा (Employees) तिथे काम करणाऱ्या सीईओचा (CEO) मोठा वाटा असतो. त्याचे निर्णय कंपनीचं भविष्य (Company's Future) ठरवतात. जगातील सर्वात हुशार सीईओंबद्दल नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
प्रीप्लाईच्या अहवालानुसार, डिपमाईंडचे (DeepMind Technologies) सीईओ डेमिस हसाबिस (Demis Hassabis) यांना जगातील सर्वात हुशार सीईओ म्हणून स्थान देण्यात आलं आहे. डिपमाईंडची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटचे (Alphabet) मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनाही हसाबिस यांनी मागे टाकलं आहे. मेटाचे मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg), टेस्ला आणि स्पेसएक्सचे एलॉन मस्क (Elon Musk) यांसारख्या प्रख्याच सीईओंना मागे टाकत डेमिस हसाबिस (Demis Hassabis) हे सर्वात हुशार साईओ ठरले आहेत.
इतर सीईओंची कामगिरी कितपत?
डीपमाईंडच्या सीईओंच्या योगदानाची दखल घेऊन अहवालात म्हटलं आहे की, "एआय संशोधक आणि न्यूरोसायंटिस्ट म्हणून दुहेरी कौशल्यासाठी ओळखल्या जाणार्या डेमिस हसाबिस यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे."
हॅसाबिस 87.33 गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. यानंतर ब्लॅकस्टोनचे सीईओ स्टीफन श्वार्झमन 74.33 आणि बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरन बफे 74 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. विशेषत: या अहवालात अॅमेझॉनचे माजी सीईओ जेफ बेझोस (5वे स्थान, 71 गुण) आणि मेटा प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकरबर्ग (8वे स्थान, 69.67 गुण) यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्यापेक्षा हुशार सीईओचा दर्जा मिळाला आहे. एलन मस्क 16व्या क्रमांकावर असून त्यांना 64.33 गुण मिळाले आहेत.
कशी केली जाते गणना?
ऑनलाईन ट्युटोरिंग फर्मने या गणनेसाठी एक मानक 100 पॉईंट स्कोअर तयार केला, जो पाच गुणांवर केंद्रित होता. हे गुण सीईओने दिलेल्या मुलाखती, मत आणि कार्यशैलीशी संबंधित होते. ज्यामध्ये ते बोलत असताना कोणत्या प्रकारचा शब्द वापरतात हे देखील पाहिलं गेलं.
त्याचप्रमाणे सीईओंना त्या त्या विषयाचं किती ज्ञान आहे? ते प्रश्नांची उत्तरं किती अचूक देतात. कोणत्याही विषयावर टीकाटिप्पणी करताना संयमाने प्रतिसाद देतात की नाही? एकंदरीत ती व्यक्ती किती हुशारीने परिस्थिती हाताळते, या सर्व बाबी गुण देताना लक्षात घेतल्या गेल्या. यानुसार जगातील सर्वात हुशार सीईओ ठरवले गेले आहेत.
हेही वाचा:
North Korea: माणूस म्हणावं की अजून काय? किम जोंगने आपल्या जनरलला संपवलं; नरकातही होत नाही इतका छळ